परिवर्तनावचे सीमोल्लंघन

23/10/2012 23 : 39
     511 Views

भारतीय संस्कृतीमध्ये दसरा अर्थात विजयादशमीला अनन्य साधारण महत्व आहे.प्रभुरामचंद्राने रावणाचा वध करून विजय मिळवल्याचा दिवस, पार्वतीरूपी दुर्गेने महिषासूर राक्षसचा नाश करून विजय प्रापत केलेला दिवस असा दृष्ट, सामाजविघातक प्रवृत्तीवर मिळवलेला विजय म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. विजयादशमी सणाचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्यकाने आपल्यामध्ये असलेल्या दुष्ट गणांचा नाश करून नैतिकता जापावी. मात्र आज समाजामध्य दररोज पहायला मिळत असलेला भ्रष्टाचार, राजकीय असथीरता, वैचारीक दिवाळखोरी, समाजातील द्वेशभाव, शेतकरी व कष्टक-यांचे दारिद््रय आणि वाढता चंगळवाद यामुळे विजयादशमी दिनी प्रत्येकाने परिवर्तानाचे सिमोल्लंघन साजरे करावे तेव्हाच ख-या अर्थाने विकशीत समाज निर्माण होईल.
सकळी झोपेतून उठल्या पासून रात्री झोपेपर्यंत वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियात भ्रष्टाचारा शिवाय दुसरे काहीच दिसत नाही.लोकशाहीतील जनतेचे प्रतिनिधी आणि नोकरदार यांची भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत.भ्रष्टाचार कोणात्या एका पक्षापुरता मर्यादित राहीला नाही तर नोकरशाही भ्रष्टाचाराचे वाहक झाली असल्यसाने राजकीय पक्ष आणि नोकरदारांनी सर्व विचारसरणी पायदळी तुडवून वैचारीक दिवाळखोरी करत भ्रष्टाचार विचारसरणीवर एकमत केले आहे. त्यामुळे देशाचे भवितव्य काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याही पुढे जावुन केंद्र आणि राज्यामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करून राज्यव्यवस्थेने निर्णय प्रक्रियेतून काढता पाया घेताना दिसते. एखादा निर्णय घ्ययचा आणि तो योग्य की अयोग्य ठरविण्यासाठी न्यायालाच्या दारात उभे रहायचे म्हणजे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी विश्वासाचे, जनकल्याणाचे निर्णय घेण्यास सक्षम नाहीत असा त्याचा अर्थ होतो.त्याच्या पुढचा कळस म्हणजे अपरिहार्यता म्हणून आघाडी स्थापन करून सत्ता मिळवायची आणि सत्तेत सहभागी झाल्यावर एकमेकाची ऊनिधुनी काढत कुरघोडी करत विरोधी पक्षच निष्क्रीय करत सत्ताधारी आणि लोकशाहीचा प्रणी असलेल्या निवडणूकामध्ये खाजगी जीवणावर खालच्या दर्जाची टिका करत, विकासाचे मुद्दे बाजूला ठेवायचे आणि साम दाम दंड भेदचा वापर करून निवडणूका जिंकाच्या आणि सत्ता मिळवून भ्रष्टाचाराला सत्तेचे कुरण उपलब्ध करायचे असा धंदा जोरात सुरू केला जातो तसेच अंगावरचे कपडे बदलल्या प्रमाणे राजकीय पक्ष, आघाड्या बदलत वैचारिक दिवाळखोरी करत समाजाचे नुकासान करायचे.व स्वतःहाचे उखळ पांढरे करून घेयचे.
भारतीय समाजात नऊ दिवस दुर्गेची पुजा केली जाते.मात्र त्याचा दुर्गेरूपी मुलगी जन्माला येणार नाही याची काळजी पुरूषसत्ताक संस्कृतीमध्ये घेत आहेत. स्त्रीभ्रण हत्तेच संदर्भात राज्यात सामाजिक कार्यकत्र्यांनी रानउठवल्यावर सरकारने डॉक्टरवरती करवाई केली. मात्र कारवाई झालेल्या डॉक्टराकडे ज्यांनी गर्भपात केले असे गुन्हेगार आई-बाप उजळ माथ्यानी फिरत आहेत. त्यामुळे गर्भपात करून घेणा-या आई-बापावरती गुन्हे दाखल करून कडक शासन कराण्याची गरज आहे. तसेच भारतीय समाजात वेगवेगळ्या धर्म-धर्मांत, प्रादेशीक मतभेद निर्माण करून राष्ट्रीय एकात्मतेला आव्हाण निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली जाते. त्यामुळे भारतीय समाजात सतत अशांतता, गुन्हेगारी, दंगली निर्माण केल्या जातात.त्याबाबत समंजशाची भूमिका घेताना कोणही दिसत नाही.
देशात शेतकरी आणि कष्टक-यांंच्या कष्टाला अर्थातच घामाला मोलच राहिलेले नाही. सतत दुष्काळाचे चटके सहन करत असतानाच सत्ताधारी मात्र शेतक-याच्या व कष्टक-यांच्या कल्याणांचा एकही निर्णय घेत नाहीत तसेच गरिबांना गॅस सिलेंडर,रॉकेल,पेट्रोल,डिझेल,धान्य माहाग करून सामन्य जनतेला जगणेच महाग केले आहे. त्यामुळे हा समाजघटक पांढरपेशावर्गांने विकांसापासून वंचित ठेवला आहे तसेच देशातील थिंक टॅक म्हणून ओळखल्या जाणा-या विचारवंतानी आणि माध्यमांनी देखिल खोबरे तीकडे चांगभले प्रमाणे दिवाळखोरी केली आहे. त्यामुळे आज शासन, समाज आणि संपुर्णव्यवस्था नैतिकतेचा मार्ग सोडून अनैतिकतेच्या मार्गावरून चालु लागले आहेत. यावर तात्काळ विचार करून नैतिकतेचा मार्ग धरला नाही तर भारतीय समाजाचा -हास झाल्याशिवाय रहाणार नाही. त्यामुळे दस-याच्या म्हणजेच विजयादशमीच्या मुहर्तावर प्रत्येक नागरिकांने आपल्या मनातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश करत देशातील दुष्ट प्रवृत्तीला गाढण्यासाठी मतदानरूपी शास्त्राचा वापर करून भारतीय समाजाल विकासाच्या वाटेवर घेवून जाण्याचे वैचारीक परिवर्तानाचे सिमोल्लंघन साजरे करावे.
विशेष संपादकिय
comments