दहशतवादाचे पितळ उघडे


डेव्हिड हेडली हा मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील माफीचा साक्षीदार झाला आहे. या हल्ल्यासंदर्भातील आवश्यक ती माहिती देण्याची तयारी दर्शवल्यानंतरच त्याला माफीचा साक्षीदार करण्यात आले. असे असले तरी इतरही काही प्रकरणात हेडलीवर आरोप आहेत आणि ते सिध्द झाल्यास हेडलीला योग्य ती शिक्षा होईल, असे राष्ट्रीय तपास संस्थेने स्पष्ट केले आहे. अर्थात, हेडलीला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिका अजुनही तयार नाही, हे ही लक्षात घ्यायला हवे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात हेडलीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे साक्ष देण्यास अमेरिकेने परवानगी दिली. परंतु त्या साक्षीसाठी त्याला भारतात पाठवले नाही. हेडलीने आपल्या कबुलीजबाबात उघड केलेल्या बाबी भारतासाठी धक्कादायक आहेत. यातून भारतातील दहशतवादी कारवायांमागे पाकस्थित दहशतवादी संघटना असून त्यांना त्या देशातून मदत आणि सहकार्य मिळत असल्याचे सत्य जगासमोर आले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला हे सत्य नाकारता येणार नाही. थोडक्यात, हेडलीच्या या साक्षीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचे पितळ उघडे पडले आहे. ही भारताच्या दृष्टीने समाधानकारक बाब म्हणता येईल. आता हाफिज सईदला भारताच्या ताब्यात देण्याच्या मागणीला जोर चढेल. त्याच बरोबर या संदर्भात पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवरू दबाव आणला जाईल. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यात कोणाकोणाचा हात होता, त्यात स्थानिक पातळीवर कोणाची मदत लाभली हे शोधून काढण्याच्या उद्देशानेच हेडलीला माफीचा साक्षीदार करण्यात आले. तो उद्देश बर्यापैकी सफल होताना दिसत आहे. अर्थात, हेडलीच्या कबुलीजबाबाप्रमाणे २६/११ च्या हल्ल्यापूर्वी दहशतवादी मुंबईत तसेच दिल्लीत येऊन गेले होते. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची त्यांनी पाहणीही केली होती. असे असेल तर ते तपास यंत्रणा तसेच गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणावे लागेल. त्या दृष्टीने या यंत्रणांनी यापुढे अधिक सतर्कता बाळगण्याची तसेच खबर्यांचे जाळे आणखी मजबूत करण्याची आवश्यकता आहे. असे असले तरी राष्ट्रीय तपास संस्थेने अलीकडेच देशाच्या वेगवेगळ्या भागातून इसिसशी संबंधित असणार्या १४ जणांना ताब्यात घेण्याची घटनाही महत्त्वाची ठरते.
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)