किनारा तुला पामराला !

24/08/2014 9 : 31
     958 Views

स्वाभिमान, अभिमान, अस्मिता अश्या भावनांचे अर्थ नीट समजून घेतले नाहीत तर त्या भावना गर्वात रूपांतरित व्हायला वेळ लागत नाही. गर्वात कित्येकदा खोटी शान आणि वृथा अभिमान सुद्धा असतो. घराण्याच्या, रीतिरिवाजांच्या, परंपरांच्या गर्वापायी कर्जबाजारी झालेले वा धुळीला मिळालेले लोक आपण पाहतो. ताठा, आढय़ता, घमेंड, माज, अहंकार ही गर्वाचीच भावंडं आहेत. ह्यांपैकी एक तरी जवळ करावा असा आहे का? गर्व आणि त्याची ही भावंडं काय देतात? कशासाठी त्यांच्या आहारी जायचं? कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेला यकोलंबसाचे गर्वगीत’ म्हटलं तेव्हा गर्व वाटावा असं कोलंबसाचं अभूतपूर्व कर्तृत्व, त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, त्याची विजिगीषू वृत्ती त्यांना अधोरेखित करायची असेल. यकिनारा तुला पामराला’ असं म्हणून सागराची कींव करण्याइतकी क्षमता निर्माण करायची महत्त्वाकांक्षा आपल्या बांधवांमध्ये जागृत करायची असेल !
कुसुमाग्रजांच्या प्रतिभेची विलक्षण झेप असलेली एक सुविख्यात कविता पृथ्वीचे प्रेमगीत!’ ह्या प्रख्यात कवितेएवढीच प्रतिभासंपन्न आणि तितकाच आगळा आशय मांडणारी त्यांची आणखी एक प्रसिद्ध कविता आहे, यकोलंबसाचे गर्वगीत!’
कोटय़वधी जगतात जिवाणू जगती अन मरती जशी ती गवताची पाती, नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली
निर्मितो नव क्षितिजे पुढतीः
असं त्यांचा कोलंबस मोठय़ा गर्वानं म्हणतो.
अमर्याद आणि अथांग सागराच्या लाटांच्या तांडवाची क्षिती न बाळगता, नव्या क्षितिजांच्या शोधात निघालेल्या नाविकांनी अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामरालाः
ह्या ओळी सार्थ गर्वानं म्हणाव्यात हे त्या हिंमतबाज नाविकांना आणि कुसुमाग्रजांच्या काव्यप्रतिभेला जसं शोभून दिसतं तसंच ह्या कवितेला यकोलंबसाचे गर्वगीत’ हे समर्पक शीर्षकही तेवढंच शोभून दिसतं.
गर्व म्हटलं की सगळ्यांना सगळ्यात आधी आठवते गर्वाचे घर खाली ही म्हण. गर्वाचं (म्हणजे गर्विष्ठाचं?) घर खाली म्हणजे कुठे, कशाच्या खाली, आधी कुठे होतं असे प्रश्न मनात यायच्या आधीच त्या म्हणीला काय म्हणायचं आहे ते आपल्याला बरोबर समजतं. कशाचाही गर्व करू नये कारण ज्या गोष्टीचा आपण गर्व करू ती गोष्ट चिरकाल टिकून राहण्याची शाश्वती नसते. उलट, नष्ट होण्याची शक्यता अधिक असते आणि गर्विष्ठ माणसाला खाली मान घालायची पाळी येऊ शकते ह्याची आपल्याला कल्पना असते. सर्वसाधारणपणे गर्व कशाचा केला जातो? रंगरूप, नाकडोळे असल्या रूपवत्तेचा, किंवा पैसाअडका जमीनजुमला असल्या मालमत्तेचा, अथवा उच्च पद अधिकार अश्या सत्तेचा. फार तर दुर्मिळ विद्वत्तेचा. रूपसंपदा बव्हंशी अनुवंशिकतेतून मिळालेली असते. त्यात गर्व करण्याजोगं कर्तृत्व काय आहे? धनसंपदा सुद्धा अनेकदा पैशाकडे पैसा जातो ह्या तत्त्वाला अनुसरून असते. सत्ता किती काळ टिकते हा मोठाच प्रश्न आहे आणि खर्या विद्वत्तेसारखी गुणसंपदा सर्वात आधी नम्रपणा आणि विनय शिकवते. म्हणजे, स्वकर्तृत्वानं थोर झालेले कधीच गर्विष्ठ होत नसतात. अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेल्यांना गर्वाची बाधा चटकन होते. म्हणूनच आपोआप,विनासायास लाभलेल्या अथवा क्षणभंगुर असलेल्या गोष्टींचा गर्व करू नये असं वारंवार बजावलं जातं.
गर्व करणारी माणसं सहसा आत्मकेंद्री असतात. आपण इतरांपेक्षा वरचढ आहोत, श्रेष्ठ आहोत ह्या खर्याखोटय़ा जाणिवेनं त्यांच्या मनाचा आणि बुद्धीचाही ताबा घेतलेला असतो. गर्वामुळे विवेकशक्ती आणि सारासारविचारशक्ती क्षीण वा नष्ट झालेली असते. त्यामुळे हळूहळू ते इतरांना कनिष्ठ आणि तुच्छ समजू लागतात. तशीच सवय लागते. शेवटी तोच स्वभाव बनतो. जगात इतरत्र चांगलं काय आहे ते बघण्याची शोधक नजर आणि जिज्ञासा गमावून बसण्याचं दुर्भाग्य वाटय़ाला येण्याचा फार मोठा धोका गर्व नावाच्या ह्या छोटय़ा शब्दात दडलेला आहे.
आमच्या माहितीतल्या एक हिंदीभाषक बाई आहेत. श्रीमंत माहेर, चारचौघीत उठून दिसेल असा चेहरा, आणि पती उच्चपदावर ह्या त्रिवेणीसंगमा’ मुळे बाईंच्या बोलण्याचा विषय सदैव एकच- मैं ! बाकीच्या बायका त्यांच्या तोंडावर काही बोलत नाहीत परंतु त्यांच्या पाठीमागे मात्र हमेशा मैं मैं करती रहती है, बकरी की तरह मिमियाती रहती है ‘ असं कुचेष्टेनं म्हणतात. बकरी जशी एकसारखी में में करत असते तसा ह्यांचा सदैव मैं मैं वर भर असतो. त्यांची तुलना शेवटी कोणाशी होते तर शेळीशी! त्यांच्या गर्वाची योग्यता किती तर शेळीइतकी, नगण्य. म्हणजेच, गर्व करणारी व्यक्ती अखेरीस हास्यास्पद ठरते ती अशी.
स्वाभिमान, अभिमान, अस्मिता अश्या भावनांचे अर्थ नीट समजून घेतले नाहीत तर त्या भावना गर्वात रूपांतरित व्हायला वेळ लागत नाही. गर्वात कित्येकदा खोटी शान आणि वृथा अभिमान सुद्धा असतो. घराण्याच्या, रीतिरिवाजांच्या, परंपरांच्या गर्वापायी कर्जबाजारी झालेले वा धुळीला मिळालेले लोक आपण पाहतो. (ह्या खानदान की शान नं कित्येक चित्रपटांना विषय पुरवले एवढाच काय तो फायदा!) ताठा, आढय़ता, घमेंड, माज, अहंकार ही गर्वाचीच भावंडं आहेत. ह्यांपैकी एक तरी जवळ करावा असा आहे का? गर्व आणि त्याची ही भावंडं काय देतात? कशासाठी त्यांच्या आहारी जायचं? गर्वामुळे उर्मटपणा, उद्धटपणा तेवढा बळावतो. गर्व जोडण्याऐवजी तोडण्याचं काम करतो. ताठय़ानं वागणार्याला कोणी जवळ करत नाही. त्याचा तोरा उतरवायची संधी कोणी चुकवत नाही. आढय़ताखोर, घमेंडखोर माणसापासून लोक चार हात दूर राहणं पसंत करतात. अहंकाराबद्दल तर काय बोलावं? अहंकारी माणसानं गोंजारून ठेवलेला स्वतःचा यअहम’ अंतिमतः त्याला स्वतःला विनाशाच्या वाटेवर नेऊन सोडतोच, सोबत त्याच्या आजूबाजूच्यांनाही चटके सोसायला लावतो. एवढं प्रलयकारी महाभारत घडलं ते द्रौपदीच्या आणि दुर्योधनाच्या अदम्य अहंकारामुळे घडलं असं म्हणतातच ना?

यवृक्ष फार लवती फलभारे
लोंबती जलद घेउनि नीरे
थोर गर्व न करी विभवाचा
हा स्वभाव उपकारकरांचा ‘
असं आपण ऐकत आलो. संपन्नता आली की गर्वानं फुगण्याऐवजी विनयानं लवायला निसर्ग आपल्याला शिकवत असतो. तशीच शिकवण देणारी आपली संस्कृती आहे. गर्व करू नये पण गर्व बाळगावा असं म्हणतात तेव्हा दोहोतला भेद जाणून घेणं अपेक्षित असतं. गर्व से कहो कि हमः ह्याच्यापुढे हिंदु हैं ‘ असलं काय किंवा दुसरं काही असलं काय, त्यानं काही फरक पडत नाही कारण ह्या गर्वात गौरव असतो. ‘ख र्रा ीिेीव ेर्ष ूेी’ म्हणताना असतो तसा. दुसर्याला तुच्छ लेखून स्वतःला श्रेष्ठ ठरवू नाही तसंच विनाकारण कनिष्ठत्वाची भावना बाळगण्याची देखील गरज नाही. सर उठाके जिओ, सीना तानके चलो असं शिकवलं जातं तेव्हा स्वतःला कमी लेखू नका, न्यूनगंड भयगंड ठेवू नका, प्रगतीच्या वाटेसाठी आणि प्रगतीच्या वाटेवर नित्यनूतन प्रयत्न करत राहा असा त्याचा अर्थ असतो. मान ताठ ठेवा म्हणजे ताठय़ानं वागा असं नव्हे तर मान खाली जाईल असं वागू नका, स्वतःला सक्षम करा. गर्वोन्नत म्हणजे गर्वानं उन्नत अवश्य व्हा पण गर्वोन्मत्त किंवा गर्वोद्धत म्हणजे गर्वानं उन्मत्त अथवा उद्धट कधीच होऊ नका. गर्व से कहोःम्हणणार्यांना हे अपेक्षित असतं, असायला हवं.
कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेला कोलंबसाचे गर्वगीत म्हटलं तेव्हा गर्व वाटावा असं कोलंबसाचं अभूतपूर्व कर्तृत्व, त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, त्याची विजिगीषू वृत्ती त्यांना अधोरेखित करायची असेल. किनारा तुला पामराला असं म्हणून सागराची कींव करण्याइतकी क्षमता निर्माण करायची महत्त्वाकांक्षा आपल्या बांधवांमध्ये जागृत करायची असेल ! गर्वाचा उज्ज्वल चेहरा त्यांना वाचकांपुढे आणायचा असेल. कुणी सांगावं?

सुषमा शाळिग्राम
साभार
नवशक्ती
comments