संपूर्ण जिल्हा खा.गोपीनाथ मुंडेमय तर राष्टवादीत खो..खो.. सुरूच

17/02/2014 18 : 10
     568 Views

लोकसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर बीड येथे भाजपा जेष्ठ नेते खा.गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे संपन्न झालेल्या महाएल्गार सभेला संपूर्ण जिल्हयातून उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे राष्ट्रवादीला धडकी भरली आहे.एकीकडे संपूर्ण देश मोदीमय झाला असतांना बीड जिल्हा मात्र गोपीनाथ मुंडेमय झाल्याचे निदर्शनास येत आहे.लोकसभेच्या निवडणूका बोटावर मोजण्या एवढया दिवसावार येवून ठेपल्या असतांनाही राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चीत होत नसल्याने राष्ट्रवादीच्या गोटात सामसूम दिसून येत आहे.तर जिल्हयातील भाजपाच्या गोटात कालच्या सभेने उत्साहाचे वातावरण निमार्ण झाले आहे तर राष्ट्रवादीचे नेते मात्र चुपचाप आहेत त्यामुळे जनसामान्यात बीड जिल्हयातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लोकसभेच्या निवडणूकी पुर्वीच अप्रत्यक्ष रित्या माघार घेतल्याची चर्चा जनसामान्यातून होत आहे.
काल दिनांक १६ फेब्रुवारी रोजी लोकसभेच्या निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपाचे जेष्ट नेते व महाराष्ट्राच्या राजकिय कुरूक्षेत्राचे महानायक म्हणून ओळखले जाणारे विद्यमान लोकसभेचे उपनेते खा.गोपीनाथ मुंडे यांनी रिपाई नेते नवनिर्वाची खा.रामदास आठवले यांच्या सत्कारानिमित्त आयोजित केलेल्या महाएल्गार सभेला जिल्हयातून उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे संपूर्ण जिल्हयात मुंडेच्या मंताधिक्याची चर्चा रंगू लागली आहे.गत निवडणूकीत खा.मुंडे ज्या मताधिक्याने निवडून आले होते त्या मताधिक्याचा रेकार्ड ब्रेक खा.मुंडे हेच करणार असल्याचा विश्वास चहाच्या टपरिवाल्यापासून पचंताराकित हॉटेलच्या वेटरपर्यत व्यक्त केला जात आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पुर्व तयारीच्या दृष्टीने खा.गोपीनाथ मुंडे यांनी नव्या ध्येयाची सुस्कृृंत व उच्चशिक्षीत तरूणाची फळी प्रस्थापीत पुत्राना बाजुला ठेवून उभी केली आहे या नव्या टिमचे नेतृत्व सक्षमपणे रणराघीणी म्हणून ओळखल्या जाणा-या आ.पंकजाताई पालवे या करीत आहेत.त्यांच्या नियोजनाला कृतीत उतरवीण्याचे काम आणि खा.गोपीनाथ मुंडे यांचे विचार आखेरच्या घटकापर्यत पोहचविण्याचे काम भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून रमेश पोकळे हे सक्षमपणे करत आहेत त्यामुळे संपूर्ण जिल्हयात भाजपाने कात टाकली आहे.
एकूणच कालची सभा म्हणजे खा.गोपीनाथ मुंडे याच्या विजयावर निवडणूकीपुर्वीच शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानीक नेत्याना आगामी लोकसभा निवडणूकीतील उमेदवारी म्हणजे राजकिय आत्माहात्याच आहे याची जाणीव होवू लागली आहे.राष्ट्रवादीच्या बीड लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीच्या बाबतीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ आणि स्थानीक नेत्यामध्ये खो..खो..चा खेळ अजुन सुरूच असल्यामुळे जनसामान्यात राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नसल्याचा संदेश मतदाराच्या मनावर रूजला जात आहे हे विशेष....!
comments