युवक महोत्सवाचे बदलते स्वरूप

31/10/2012 17 : 36
     286 Views

बीड, प्रा.सुचिता मस्के
विद्याथ्र्यांसाठी ‘युवक महोत्सव’ आयोजित करण्यामागचा हेतूच काळाच्या ओघात कुठेतरी मागे पडला आहे. विद्याथ्र्यांचे संपूर्ण व्यक्तीमत्व परीक्षेतील उत्तरपत्रिकेमध्ये दिसून येत नाही. त्यांना अभिव्यक्त होण्यासाठी एखादं व्यासपीठ असावं, आत्मप्रकटीकरणासाठी आकाश असावं म्हणून युवक महोत्सवाचं आयोजन केले जाते. युवक महोत्सवाच्या माध्यमातुन विद्याथ्र्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, सांस्कृतिक देवाण-घेवाण व्हावी,विद्याथ्र्यांमधील नेतृत्वगुण विकसीत व्हावेत या उद्देशाने युवक महोेत्सव आयोजित केले जात होते. परंतू हा मुळ हेतूच आज नाहीसा होत चालला आहे. आज युवकमहोत्सवामधून ख-या कलावंतांना न्याय मिळतच नाही.यावर बोलकी प्रतीक्रिया देताना एक कवी म्हणतात गांधीजीके देश में, गधे घोडेके रेस में घोडेको नहीं मिल रहा हैं घास, और गधा खा रहा है चवनप्राश.
विविध महाविद्यालय, विद्यापीठांमधुन, विविधप्रकारच्या फेस्टिव्हलचे म्हणजेच महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यापैकीच एक युवक महोत्सव होय. दरवर्षी देशातील सर्व विद्यापीठांमार्फत विद्यापीठांतर्गत येणा-या महाविद्यालयातील विद्याथ्र्यांसाठी या युवक महोत्सवाचे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षांत युवक महोत्सव या संकल्पनेला उचलुन धरण्याचे काम काही प्रतिभाशाली कार्यकत्र्यांनी केले. अनेक विद्याकलांना त्यामुळे व्यासपीठ मिळाले. या युवक महोत्सवाला उच्चता, भव्यता प्राप्त झाली, पैशाचा प्रभाव, व्यावसायिक कलावंताना अग्रक्रम, उपासनेची उपेक्षा असे काही दोष दिसून येऊ लागले.
प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, ‘उत्सवप्रियता हा समाजाचा स्थायीभाव आहे. सर्व प्रकारच्या उत्सवांमागे एकच हेतू असतो तो म्हणजे जीवनाची सुंदरता, आनंदमयता वृद्धींगत करणे’ .
युवक महोत्सवांमधून ३५ कलाप्रकार सादर केले जातात या कलाप्रकारांमधूनच महाराष्ट्राला नवीन कलावंत मिळत असतात. अशाच स्नेहसंमेलनाने, महारष्ट्राला ना.सि.फडके सारखे साहित्यीक दिले.
युवक महोत्सवाचे एैश्वर्य कमी होत चालले आहे, आता राहिली आहे ती फक्त पैशाची उधळ-माधळ, व्यावसायिक कलावंताची हजेरी, आकर्षण, झगमगाट, महागडा वाद्यवृंद आणि सिनेनटांचे आकर्षण या गोष्टी युवक महोत्सवांमध्ये नकळत रूळल्या. आता कलेपेक्षाही पैशांना मान मिळतो. योग्य कलावंतांना आता या महोत्सवांमधून न्याय मिळत नाही. हा महोत्सव विद्यार्थी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला जातो की, फक्त विद्यापीठ निधी खर्च करण्यासाठी?
युवक महोत्सवाच्या उद्यानामध्ये विद्यार्थी कलावंतानी आपली कला फुलवावी हा उदात्त हेतू आज राहिलाच नाही. ज्या युवक महोेत्सवांनी रंगभूमीला, चित्रपटसृष्टीला कलावंत दिले. आज त्याच कलेचा आणि कलावंतांचा बक्षीसे ‘मॅनेज’ करून अपमान केला जातो. यापेक्षा दुर्देव ते काय?
युवक महोत्सवाचे आयोजन केले तर त्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही तेवढेच गरजेचे आहे. प्रत्येक कला प्रकारासाठी त्या कलेशी निगडीत तज्ज्ञ परीक्षक असणेही तेवढेच महत्वाचे आहे. अशा महोत्सवांमधून महाविद्यालय किंवा संस्था किती मोठी आहे हे न पहाता, कोणत्या संघांनी उत्कृष्ट सादरीकरण केले हे पाहूनच परितोषीके प्रदान करण्यात यावीत.
या महोत्सवांमध्ये विद्यार्थीही चांगले असतात व ते उत्कृष्ट कला गुणांचे सादरीकरण ही करतात. मग हा गढूळपणा येतो कुठून? युवकमहोत्सव आयोजीत करणा-या व्यवस्थापनाने व कला प्रकारांचे परिक्षण करणा-या परिक्षकांनी शिस्तबद्ध युवक महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या सामाजिकतेची व राष्ट्रीयत्वाची उंची वाढविण्याचा निर्धार करावा व ख-या कलावंतांना व्यासपीठ मिळवून द्यावे.कारण कलावंतांपेक्षा कला ही श्रेष्ठ असते.
comments