साहित्याचे प्रयोजन : स्वातंत्र्य आणि मानवमुक्ती

30/10/2012 18 : 5
     471 Views

मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे पाचवे अंबाजोगाई साहित्य संमेलन २७ रोजी अंबाजोगाईत होत आहे. ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ.दिलीप घारे उद्घाटक आहेत. संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संतोष मुळावकर यांचे अध्यक्षीय भाषण येथे देत आहोत.
स्वातंत्र्य आणि मानवमुक्ती हे तर साहित्याचं मुळ प्रयोजन असत. येथील तेजस्वी स्वातंत्र्य लढ्याला आणि मानवमुक्तीच्या मनःस्वी चळवळीला अभिवादन. या लढ्याच्या, चळवळीच्या उपक्रमांना व सामाजिक अभिसरणाला अभिवादन.
साहित्य संमेलन हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक अभिसरण असते. सृजनशीलता ही या अभिसरणाची अभिवृत्ती असते या अभिवृत्तीला हवे असते. आत्मीय भावभावनांचे उत्कट ओले आणि वैचारिक सुगीचे उदात्त समृद्ध जागरण.
अंबाजोगाई हे तर कवितेचं गाव आहे. येथील माणून दोन चार कविता खिशात टाकूनच घरा बाहेर पडत असतो. मी असाच कविता खिशात टाकून परगावी गेलो होतो. गाव सुसंस्कृत होते. माझा खिसा फुगीर होता. माझ्या खिशाजवळ कुणीतरी फिरकत होते. तरी मी म्हटले,काही नाही. कविता आहेत. वाटल्यास वाचून दाखवतो. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे.
तो म्हणाला, ‘तेवढं सोडून बोला,’
तो सुसंस्कृत गावातला असूनही त्याचा विश्वास बसला नाही. त्याने माझा खिसा मारला. माझ्या कविता गेल्या.
पण थोड्या वेळाने तो आला आणि माझ्या हातावर माझ्या कविता ठेवत म्हणाला, ‘विनाशकाले विपरित बुद्धी : कवितेतुन काहीही मिळत नाही, हे माहीत असुनही तुम्ही कविता का लिहिता? विनाशकाले काव्य, बुद्धी : विनाशाचा काळ जवळ आला की, कविता करण्याची ‘विपरित बुद्धी : होत असते’ .
मी म्हटलं, ‘विकास काले काव्य बुद्धी : विकासाची ओढ असली की, माणसे कविता करायला लागतात’ .
तो म्हणाला, ‘तुमच्या कविता तुम्ही करत राहा. मग, त्या खिशात ठेवून आमची फसवणूक कशाला?’
मी म्हटले, ‘कविता बिन खिशाच्या असतात. बिनखिशाच्या कवितामध्ये आर्थिक समतेची तत्वे असतात. आर्थिक समतेतच जीवनाचा खरा अर्थ असतो.’
तो म्हणाला, ‘तुम्ही अर्थाबद्दल बोलूच नका. अर्थाचा अनर्थ करणारे तुम्ही...तुम्ही लेखक लोक हातात सोने घेतले की त्याची माती करतात.’
मी म्हटलं, ‘खरंच, हातात सोने घ्यावं आणि त्याची माती व्हावी. पेरणी मातीतच करता येते सोन्यात नाही. पीकं मातीतच घेता येतात सोन्यात नाही.’
तो म्हणाला ‘ म्हणूनच... म्हणूनच लोक तुमच्यापासून दूरावतात. अशा अव्यवहारी बोलण्यामुळे आणि लिहिण्यामुळे लोक तुम्हांला जवळ करत नाहीत.’
मी म्हणालो, ‘हा अव्यवहार नाही. तर व्यवहार आहे. निश्चयात्मक व्यवहार आहे. दोन चार जणांनी दूर केले तरी पिढ्यान्पिढ्या जवळ येत राहतात. जवळ आलेल्या पिढ्या माणसांना जवळ करत राहतात.’
तो म्हणाला, ‘हे फक्त पुस्तकांतच शोभून दिसते. तुम्ही लेखक पुस्तके वाढता. काय उपयोग या पुस्तकांचा ? काय असते तुमच्या पुस्तकात?’
मी म्हणालो, ‘तुमच्या नव्हे, आपल्या पुस्तकात म्हणा, आपल्या पुस्तकात काय नसते? अवघा माणूस असतो. जसा आहे तसा. आणि जसा हवा आहे तसा. पुस्तकांत माणसांची प्रगती असते. संस्कृती असते, आणि विकृती पण असते. माणसाचे खरेपण खोटेपण असते. ख-या माणसाला सादर करणार पुस्तक खोटं नसते. पुस्तकातल्या कल्पकतेत उद्याचे विज्ञान असते. प्रत्यक्षातला अजीवही पुस्तकाला जीव असतो.’
comments