रिंकु राजगुरूला सैराटच्या प्रसिद्धीचा फटका

2016-09-17 21:02:33
     485 Views

आर्चीने ३० जूनलाच शाळा सोडली
सोलापूर : सैराटमधील आर्ची अर्थात रिंकू राजगुरु यंदा दहावीत शिकत आहे, मात्र आर्चीला या सैराट चित्रपटाच्या प्रसिद्धीचा चांगलाच फटका बसला असल्याचे दिसत आहे. कारण तिने आता शाळेलाच रामराम ठोकला आहे. आर्चीने ३० जूनला शाळा सोडली असल्याचे माहिती आता समोर आली आहे.
प्रसिद्धी आणि सध्या मिळत असलेली कामे, यामुळे आर्चीने शाळा सोडली असून रिंकूने १७ नंबरचा फॉर्म भरला असल्याचे सांगण्यात येत आहे. ती आता घरी अभ्यास करुन बाहेरून परीक्षा देणार आहे कारण आर्ची जिथे जाईल तिथे प्रचंड गर्दी जमते. त्यामुळे तिला शाळेत जाणेही अवघड झाले होते. त्यामुळे घरी अभ्यास करुन बाहेर परीक्षा देण्याचा निर्णय तिने घेतला आहे. रिंकू राजगुरु अकलूजच्या जिजामाता कन्या विद्यालयात शिकत होती. सिनेमामुळे तुफान प्रसिद्धी मिळालेली आर्ची यंदा दहावीत गेली. नववीत तिला ८४ टक्के गुण मिळाले. मात्र आता तिने शाळेतूनच नाव काढून घेतले आहे.
comments