यूसुफवडगाव येथे तरुणाची आत्महत्या


यूसुफवडगाव(प्रतिनिधी) केज तालुक्यातील युसूफवडगाव येथे आज ११ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास सचिन बापुराव वैरागे वय (२१) यांने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत सविस्तार माहिती अशी की युसूफवडगाव येथील रहिवाशी सचिन बापुराव वैरागे वय(२१)यांने दुष्काळी परिस्थिति मुळे शेतातील नापिकीला व कामधंदा नसल्याने व बेरोजगारीला कंटाळून गावच्या जवळील असणा-्या लेंडी ओढ्यात आज पहाटे जांभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.याबाबत सर्व स्तरातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घरातील कर्ता कर्तुकिला आलेला मुलगा अशा अचानक जण्याने त्यांच्या कुंटूबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.त्याच्या पश्चात आई वडिल,एक भाऊ असा परिवार आहे.




comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)