आगीत अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा जळून मृत्यू

11-02-2016 : 10:35:05
     261 Views

माजलगाव : गोठ्याला लागलेल्या आगीत अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा जळून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील लोणगाव शिवारात रविवारी सायंकाळी घडली. या बालकाची दोन भावंडे बालंबाल बचावली.

दुष्काळामुळे जगणे अशक्य झाल्याने लोणगाव येथील ऊस वाहतूक चालक बापू आश्रुबा कोळसे पत्नी मुलाबाळांना घरी ठेवून कोल्हापूर येथील विश्वास सहकारी साखर कारखान्यावर कामासाठी गेले होते. काळसे यांना अडीच एकर शेती असून यात थोडाफार कापूस आला असल्याने त्याची वेचणी करण्यासाठी रविवारी गीता कोळसे तिची सासू, जाऊ अशा तिघी जणी शेतात गेलेल्या होत्या. शेतातील गोठ्यात हर्षद, प्रशांत सुषमा उत्रेश्वर कोळसे यांची पाच महिन्यांची मुलगी होती. गोठ्याला शॉर्टसर्किटने आग लागण्यापूर्वी अर्ध्यातासातच पाच महिन्यांची मुलगी रडू लागल्याने तिची आई तिला गोठ्यातून बाहेर घेऊन गेली होती. रविवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास गोठ्या जवळून गेलेल्या वीज तारेत स्पार्कींग होऊन अचानक आग लागली. तेव्हा गोठ्यातून धूर निघत असल्याचे पाहून बाजूच्या शेतात काम करत असलेले अशोक कोळसे यांनी गोठ्याकडे धाव घेतली. पाच वर्षाच्या प्रशांतला बाहेर काढण्यासाठी ते गोठ्यात गेले परंतु दरवाजा उघडत नसल्याने अशोक यांनी आरडाओरड केली. ही आरडाओरड एेकून शेतात पाण्यासाठी गेलेले सुंदरराव कोळसे हे धावतच गोठ्याकडे आले. त्यांनी आगीत गोठ्याचा दरवाजा उघडून अशोक प्रशांत या दोन बालकांना बाहेर काढले परंतु गोठ्यातील झोळीमध्ये झोपलेल्या हर्षदला ते विसरले.
गोठ्याला लागलेली आग पाहून कापूस वेचत असलेली हर्षदची आई, गीता, आजी शेतकऱ्यांनी गोठ्याकडे धाव घेतली. गीताला प्रशांत दिसला परंतु हर्षद दिसत नसल्याने तिने टाहो फोडला. आगात जाता येत नसल्याने चिमुरड्या हर्षदला कोणीही वाचवू शकले नाही. सर्वाच्या समोरच चिमुरड्याचा कोळसा झाला. हर्षदचे वडील बापू कोळसे हे माहिती मिळाल्यांनतर सोमवारी सकाळी सात वाजता गावात आले. सकाळी दहा वाजता तहसीलदार अरुण जराड, तलाठी, मंडळाधिकारी, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. )

आग लागल्यानंतर मोठा मुलगा भुजंग आई-आई असे ओरडला. त्यानंतर गीता कोळसे यांनी गोठ्याकडे धाव घेतली.

४आग मोठी असल्यामुळे तिला काहीच करता आले नाही. हर्षवर्धन डोळ्यादेखत जळत होता. मातेने टाहो फोडल्याने उपस्थितांचे हृदय हेलावून गेले.

४वाचलेली इतर दोन चिमुकले प्रचंड भयभीत अवस्थेत आहेत.

बापूराव कोळसे यांनी ऊसतोडीला जाताना तिन्ही मुले लहान असल्यामुळे पत्नी व मुलांना गावीच ठेवले होते.

४आगीत त्यांचा मुलगा हर्षवर्धन तर वाचला नाहीच परंतु गोठा खाक झाल्यामुळे संसार उघड्यावर आला. खबर मिळताच ते लोणगावकडे रवाना झाले होते.
comments