परभणीत दरोडा घालून तीन जणांची हत्या

2016-02-04 20:18:38
     239 Views

परभणी- दोन घरांवर दरोडा घालून तीनजणांची निघृण हत्या करण्याची धक्कादायक घटना परभणी येथे घडली. या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी झाले. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना असून परभणी जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

सुभाष पठाडे, त्यांची पत्नी शांताबाई सुभाष पठाडे आणि भाऊराव राजाराम फुलपगारे यांची हत्या करण्यात आली.

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील ताडबोरगाव शिवारात बुधवारी पहाटेच्या सुमारास सुभाष पठाडे यांच्या घरात काही दरोडेखोर घुसले. त्यांनी पठाडे दामत्याला मारहान करत लुटण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडे काहीही मिळाले नाही म्हणून त्यांनी या दोघांची दगडाने ठेचून आणि कु-हाडीने वार करून हत्या केली.

त्यानंतर हे दरोडेखोर भाऊराव फुलपगारे यांच्या घरात घुसले. कुटुंबातील सदस्यांना मारहान करत त्यांच्याजवळील साहित्य हिसकावून घेतले. त्यांच्याकडेही काही रक्कम वा ऐवज मिळाली नसल्याने फुलपगारे यांच्यावर कु-हाडीने वार करून त्यांचा खून केला.

दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात सूर्यभान भाऊराव फुलपगारे व पार्वतीबाई भाऊराव फुलपगारे या जखमी झाले आहेत. त्यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
comments