प्रेमविवाहास नकार; प्रेयसीची आत्महत्या

25-02-2015 : 07:37:38
     462 Views

माजलगाव : तु लग्न करु नकोस मी तुला आयुष्यभर साथ देईल अशी विनवणी प्रेयसी ने प्रियकराला केली मात्र प्रेयसीची विनवणी प्रियकराने धुडकावून लावली, त्यामुळे प्रेमात हरलेल्या प्रेयसीने प्रियकराच्या घरीच व्हॅलॅनटाईन दिनीच विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना माजलगाव येथील मंगलनाथ कॉलनीत घडली. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही शासकीय कर्मचारी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले आहे. या घटनेत प्रेयसीने विष घेतले की तिला ते पाजण्यात आले. याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती पुढे आली नाही.
माजलगाव येथील कृषी कार्यालयात मिथुन मोतीराम खोब्रागडे हा सन २००९ पासून लिपिक पदावर कार्यरत आहे त्याचे माजलगाव तहसील कार्यालयातील लिपिक वैशाली पुरुषोत्तम कारले हिच्याशी प्रेमसंबंध जुळले. दोघेही प्रशासकीय कामानिमित्त तहसील कार्यालयात वारंवार भेटत असत. त्यात वैशाली ही विवाहित होती. तिचा पती विनोद सरवदे हा बुलढाणा येथे नौकरीस असल्याने तेथेच राहत असे. तर कृषी कार्यालयात लिपिक असलेला मिथुन खोब्रागडे हा अविवाहित आहे. दरम्यान वैशाली हिची बदली औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयात पदोन्नतीवर झाली होती. मात्र या प्रेमविरांच्या भेटी वारंवार प्रियकर राहत असलेल्या माजलगाव येथील मंगलनाथ कॉलनीतील घरी होत असत.
काही दिवसा पुर्वी वैशाली हीस आपला प्रियकर मिथुन याचा विवाह जुळल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे वैशाली व्हॅलेंनटाईन डे च्या निमित्ताने आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी औरंगाबाद येथून १३ फेब्रुवारीच्या रात्री माजलगावातील प्रियकराच्या घरी आली होती.
यावेळी दोघांमध्ये रात्रभर प्रेमविवाहबाबत चर्चा झाली. यावेळी प्रेयसी वैशाली हिने प्रियकराला घरच्यांनी जमवलेल्या मुलीशी लग्न करु नकोस तू माझ्याशी प्रेमविवाह कर...असा आग्रह धरत आपल्यासोबत लग्न करण्याची विनंती केली. यावेळी वैशालीने आयुष्यभर साथ देण्याची मागणी प्रियकराला केली. मात्र त्याने ती धुडकावली. रात्रभर दोघांमध्ये लग्नाबद्दल चर्चा झाली. मात्र याचे फलीत काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आपला प्रियकर आपल्याला सोडून दुसरी सोबत विवाह करणार असल्याने तसेच आपण आपले सर्वसर्वस्व पणाला लावूनही प्रियकराने आपल्याला धोका दिला आहे. या नैराश्यापोटी वैशाली मनातून खचून गेली. जर प्रियकरच आपला स्विकार करत नसेल तर आपल्याला जगून काय उपयोग? हा विचार वैशालीने करत व्हॅलेनटाईनडेच्या सुर्योदयापुर्वी पहाटेच्यावेळी प्रियकर मॉर्निंग वॉकला गेल्यावर वैशालीने विष प्राशन करून आत्महत्या केली. तासभरानंतर मिथुन खोब्रागडे हा बाहेरुन आल्यावर त्याला प्रेयसच्या तोंडातून फेस आल्याचे, ती निपचित पडल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्याने तातडीने पोलिसांना फोन करून सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन मयत वैशाली कारले हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असुन प्रियकर मिथुन खोब्रागडेला ताब्यात घेतले आहे.
comments