भोळ्या प्रियकराची अभ्यासकडून अभ्यासाकडे वाटचाल

17/07/2014 20 : 38
     669 Views

तो खुप लहान होता...तसा मनाने खुप मोठा पण शरिराने लहान... गावातच दहावीपर्यंत शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना नेहमी पुढच्या बेंचवरच. तो दहावीत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला. त्याचा गौरव करण्यात आला. हुशार असलेल्या या मित्राला खूप उंच शिखर गाठायचे होते. तो त्यासाठी रात्र-रात्र जागूण काढीत अभ्यास करायचा. त्याच्या या अभ्यासाला नंतर प्रेमाने लगाम घातला. अवघ्या काही दिवसातच त्याचे एका मुली सोबत सुत जुळले, तीच्या प्रेमात तो आंधळा झाला होता. सोळाव वरीस धोक्याचे हे जे गाणे आहे हे खरोखरच खरे आहे. तो प्रेमाच्या धुंंदीत तीन वर्ष अभ्यासापासून दुरावलेला हा मित्र पुन्हा अभ्यासाकडे वळला. आणि आज तो पुन्हा जून्या पद्धतीनेच अभ्यास करीत आहे. मात्र या दरम्यानच्या काळात अनेक अडचणी आल्या. या निखळ प्रेमाला आडवा आला तो समाज आणि कौटुंबीक परिस्थिती...
दहावी झाली आणि माहविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तो शहराच्या ठिकाणी आला. सुरूवातीचे काही दिवस खुप मन लावून अभ्यास केला. वर्गातील कोणत्याच मुलीकडे कधी वाईट नजरेने पाहिले नाही. मात्र गावातच लग्न समारंभासाठी एक मुलगी पाहूणी होऊ न आली होती. कधी नाही तो त्या गल्लीत गेला. तेथे जाताच दोघांची नजरा नजर झाली. नंतर दोन चार चकरा मारल्यानंतर लाईन फिट झाली. हा तसा बोलण्यात पटाईत होता. त्याने गोड बोलून तीचा चुलतभाऊ जवळ केला. त्यानंतर लाईनचे रूपांतर काही दिवसातच प्रेमात झाले. ती राहणारी घाटावरची. त्याच्या नजरेत ती ऐश्वर्या, दीपीका, काजल, तमन्ना यांच्यापेक्षा सुंदर होती. त्यांचे दोघांचे बोलणे दिवसेंदिवस वाढतच गेले.यातुन दोघांनी एकमेकांचा विश्वास जिंकला. प्रेमात बोलण्यासाठी महत्वाचे माध्यम म्हणजे मोबाईल. त्याने एक मोबाईल घेतला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर तिला पण एक मोबाईल घेऊन दिला. मग दोघांनी उन, वारा, पाऊस यांचा विचार न करता रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र बोलण्यासाठी एक केली. हा तर तीच्या प्रेमात एवढा वेडा झाला होता की, पाऊस आला तर आडोसा म्हणून ट्रॅक्टरच्या ट्रालीखाली जाऊन बोलायचा. दोघांनाही आता हे चोरून लपून बोलायचे आणि भेटायचे थांबवायच होते. कारण अशा गोष्टी लवकरच डोळ्यासमोर येतात. आणि समाजासमोर आलेल्या या गोष्टीचा काहितरी विपरीत परिणाम घडल्याशिवाय राहत नाही.
दोघांनीही लग्न करायचे ठरवले. तीचाही लग्नाला होकार मिळाला. मात्र कोणास ठाऊक या प्रेमाला कोणाची नजर लागली ते. दोघांनीही ही गोष्ट घाबरत घाबरत का होईना घरच्यांच्या कानावर घातली. ही गोष्ट ऐकताच दोघांच्याही घरी जणू काही अणुबॉम्बच फुटल्यासारखे वातवरण झाले. पुढे वातावरण चिघळत गेले. या प्रकरणामुळे तीच्याही आणि याच्याही घरी वादळापुर्वीची शांतता पसरली होती. दोघांचेही बोलणे बंद करण्यात आले. मात्र खर प्रेम असल्यामुळे शेवटी फोन झालाच. गळ्यापर्यंत आलेला हा प्रकार थांबविण्यासाठी पळूण जावून लग्न करायचे ठरवले. मात्र संस्कारीत मुले कशी असतात या दोघांकडून शिकावे. आपण पळून गेलो तर आपल्या आई-वडीलांच्या इभ्रतीला धोका पोहचेल. समाज काय म्हणेल याचा त्यांनी विचार केला आणि त्यादिवशीचे बोलणे केवळ आश्रुंच्या प्रवाहात वाहून गेले.
शेवटी तो दिवस आलाच. छोटीसी शासकीय नौकरी असलेल्या एका मुलाशी तीचे लग्न झाले. तीच्या लग्नाची गोष्ट ऐकुण त्याच्यावर जणू आभाळाएवढे दुःखच कोसळले. तो खुप खचला होता. यातून बाहेर निघण्यासाठी त्याला काहीच समजत नव्हते. मात्र तो आज अभिमानाने सांगतो, की मी या प्रेमातून केवळ माझ्या मित्रांमुळेच बाहेर आलो. त्यांनी मला धीर दिला.
तीचे वर्षभरापुर्वीच लग्न झाले असून ती लवकरच आई बनणार आहे. हा मात्र आजही सिंगल आहे, रात्र-रात्र जागून अभ्यास करीत तो आज अधिकारी बनण्यासाठी मेहनत घेत आहे.विशेष म्हणजे तो वर्गात आता पुन्हा पहिल्यासारखाच प्रथम येत आहे. मात्र घरचे संस्कार चांगले असल्याने आणि आपल्या ख-या प्रियसीला धोका न देता तो आज एकटाच जीवन जगत आहे. त्याच्या आयुष्यात आतापर्यंत अनेक मुली आल्या आणि गेल्या. त्याला अनेक जनींनी प्रपोजही केले मात्र याने खरी परिस्थिती सांगताच समोरची मुलगीही खाली मान घालून गेली आणि तो आज अनेकांना मार्गदर्शन करीत आहे, की प्रेम करावे पण त्यामध्ये प्रामाणिकता असावी, मात्र त्याला निवांत वेळ मिळाला की तो आजही जुन्या आठवणी काढून हमसूम रडत असतो. मित्र आल्यावर तो मात्र स्वतःला ताबडतोब सावरतो आणि आपण कोणाच्या आठवणी काढतच नव्हतो असे दाखवून देतो.
निखळ मनाने प्रेम करणा-यांना समाज का आडवा येतो, घरचे लोक या गोष्टींना का समजून घेत नसतील. एकमेकांवर प्रेम करणारे हे दोघे दुस-याशी लग्न झाल्यावर खुश राहतील का, यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत. मात्र या संस्कारीत दोघांना खरोखरच सलाम करायला पाहिजे.
मीत्रांनो यासारख्या अनेक कहाण्या आहेत, त्या आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू... याचा कोणीही गैरअर्थ काढू नये . आपण नेहमी सकारात्मक विचार करावा, तरच आपण यशस्वी होऊ.. या मित्राच्या पे्रमाला माझा सलाम आणि तुमच्या पे्रमाला शुभेच्छा....
आपला मित्र
सोम.....
comments