बा...तु...मला कारं सोडून गेलास...?

15/06/2014 23 : 4
     789 Views

स्वतःहा अंगात फाटकी बनियाण घातली पण माझ्यासाठी जींनची पॅनट इकत घेतली स्वतःदुखात राहून मला सुखात ठेवण्यासाठी जीवाचं राण केलं.माझ्यासाठी तुम्ही दुस-याच्या रानात राबराब राबलात दुस-याच्या बांधावर जावून मालकाचं राण पिकवणा-या माझ्या बा तु आज कुठं हायीस रं ...
मीत्राहो आज देशात तुम्ही पाहात असाल समाज किती खालच्या पातळीला जावून ठेपला आहे. खरोखरच या समाजातील विकृती बद्दल सांगताना लाज वाटतेयं पण आजही या समाजाचत परिवर्तन करण्यात व आपल्या सारख्या नवख्या पोरांना घडविण्यात आपल्या बापाचं योगदान म्हणजे ना पैशात भरून येण्यासारखं ना शब्दात. आज फादर्स डे पार पडला सांगायला दुःख होतं. जे तरूण ‘व्हॅलेनटाईन डे’ ‘ फे्रंडशिप डे’ उत्साहात साजरा करतात त्याच तरूणाईला आज ‘मदर्स डे’ आणि ‘फादर्स डे’ या दिवशी आपल्या जन्म दात्या माता-पित्यांना साधं फुल ही द्यायला वेळ मिळत नाही ही खेदाची बाब आहे.
असाच एक गरीबीतला तरूण आज स्वतःशीच विचार करत होता, ज्या माय बापानं आपल्याला जन्म दिला तेच आज आपल्यात नाहीत. याच खुप दुःख झाल्याचं त्याला जाणवत होतं. वयाच्या पाचव्या वर्षी काळाने घाला घालत माझ्यापासून आईला हिरावले खुप खचलेलो असतांना मला माझ्या बा नच मायेचा आधार दिला. या बा बद्दल मी खुप गैरसमज केले मला वाटत होतं की, माझ्या माईला देवाघरी पाठविलं. माझा बा रोज दारू ढोसून माझ्या माईला मारायचां असे मला माझे नातेवाईक सांगायचे पण खरंच काही लोक घट्ट नाती तोडण्यासाठी किती प्रयत्नशिल असतात हे मी अनुभवलं. माझ्या बापानं दुस-याच्या रानात जाऊन साल धरलं. माझ्या शिक्षणासाठी स्वतःचा घाम गाळला आणि मला पैसा पुरविला. माझ्या बापा बद्दल आज खुप काही लिहिण्यासारखं आहे मात्र जुण्या आठवणी आढल्यानंतर डोळ्यातून अश्रुंचा महापुर ओसंढून वाहिल्या शिवाय राहणार नाही. माझ्या बापानं माझ्या डोळ्यात कधीच अश्रु येवू दिले नाहीत मग त्याचं हे स्वप्न मी का अधुर ठेवू?
ज्या बापानं मला शिकवून कलेक्टर बनविलं तोच बाप माझा आनंद पाहण्यासाठी या जगात नाही याचं खूप दुःख होतंय. माझा बाप जर आज असता तर माझ्या पेक्षाही जास्त आनंद माझ्या बापाच्या तोंडावर दिसून आला असता. म्हणूनच म्हणतो बा तू कारं मला सोडून गेलास....
यामधून आम्हाला ऐवढेच दाखवायचे आहे की, आजही काही मुलांमध्ये आपल्या बापाबद्दल न्युनगंड आहे. पहिल्यांदा बापाचा तिरसकार करणारे व बापाच्या घामावर ऐसी च्या खोलीत बसणा-या तरूणांना नंतर पश्चाताप होतो.म्हणूनच जेवढे आईवर प्रेम करता तेवडेच प्रेम वडीलांवरही करा. ‘व्हॅलेंटाईन डे’ ‘फे्रंडशिप डे’ ला थारा न देता आपल्या माता-पित्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या माता-पित्यांचा सन्मान ठेवा. ऐवढीच फार्दस डे च्या दिवशी अपेक्षा...
आपलाच
सोमा
comments