नभोवाणीतील करिअरच्या संधी


नभोवाणीतील करिअरच्या संधी
इलेक्ट्रॉनिक दूरचित्रवाणीतल्या विविध विभागांचा आढावा आपण घेतला होता. आता नाभोवाणीतील वेगवेगळ्या विभागांचा आढावा आपण घेऊयात.?ज्यात करीअरच्या संधी कशा असतात हे लक्षात येईल. यात सर्वात आधी नाभोवाणीची एकूण रचना कशी असते हे आपल्याला बघायला हवं. यासाठी ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आकाशवाणीची रचना आपल्यााला उदाहरणादाखल घेता येते.
ीरवळेभारतासारख्या खंडप्राय देशामधले आकाशवाणी हे अतिशय सशक्त असे माध्यम आहे. एकूण क्षेत्रफळाच्या?९३ टक्के आणि लोकसंख्येच्या ९९ टक्के भागापर्यंत आकाशवाणीचे प्रसारण पोहोचते. सध्याच्या तारखेला आकाशवाणीची एकूण भारतात वेगवेगळी ३०० केंद्रे आहेत. आणि या केंद्रांप्रमाणे प्रत्येक केंद्राला डायरेक्टर जनरल निर्देशक नेमलेला असतो. त्या त्या आकाशवाणी केंद्रांमध्ये घडणा-या घटनांमध्ये प्रमुख अशी जबाबदार व्यक्ती असते. याखेरीज तेथे वेगवेगळे विभाग असतात आणि राज्य पातळीवरती तसेच राष्ट्रीय पातळीवरती त्यांचे राष्ट्रीय आणि प्रादेशिक अशीसुद्धा मुख्य केंद्रं असतात. एकूण सगळ्या ऑल ओव्हर इंडियाचा म्हणजेच संपूर्ण आकाशवाणीचा एक प्रमुख निर्देशक असतो. डायरेक्टर जनरल असे त्याचे पद असते. याखेरीज प्रत्येक विभागाची किंवा केंद्राची रचना यामध्ये कार्यक्रम विभाग, अभियांत्रिकी विभाग, प्रशासनिक विभाग आणि बातमी विभाग अशी रचना केलेली असते. यापैकी पुन्हा एकदा कार्यक्रम विभागामध्ये प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरती वेगवेगळे विभाग असतात. तसेच बातमीच्या विभागामध्येसुद्धा मुख्य संपादक आणि सहसंपादक किंवा उपसंपादक आणि वार्ताहर तसेच अर्धवेळ वार्ताहर अशी रचना केलेली असते. इंजिनीअरिग विभागामध्ये एक विकासात्मक विभाग असतो. आणि दुसरा नवीन संरचना किंवा पायाभूत उभारणी विभाग असासुद्धा असतो. या वेगवेगळ्या विभागांमधील संधीचा आपण विचार करूयात.
कार्यक्रम विभाग
कार्यक्रम विभाग हा आकाशवाणीमध्ये जे काही वैविध्यपूर्ण कार्यक्रम प्रसारित केले जातात त्याच्यासाठी जबाबदार विभाग असतो. अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल हा याचा प्रमुख असतो. आणि राष्ट्रीय पातळीवरती याचे कार्य चालते. या विभागामध्ये पुन्हा एकदा कार्यक्रम अधिकारी नेमलेला असतो. याखेरीज त्याच्या मदतीला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आणि काही मुक्त रीतीने कार्यक्रमनिर्मिती करणारे ज्यांना कॅज्युअल्स असे म्हटले जातात. त्यांची नेमणूक केली जाते याशिवाय काही जण करार पद्धतीवर नेमलेले असतात. असा हा कार्यक्रम विभाग असतो. या विभागामध्ये आकाशवाणीचे संगीतविषयक कार्यक्रम, नृत्यविषयक कार्यक्रम, बातम्यांवर आधारीत कार्यक्रम, अशी वेगवेगळी आखणी केलेली असते.
दुसरा महत्त्वाचा विभाग आहे तो आहे अभियांत्रिकी विभाग
कोणत्याच प्रकारच्या प्रसारणाच्या सेवेसाठी जी काही तांत्रिक उभारणी किंवा टेक्निकल सेटअप लागतो त्यासाठी हा अभियांत्रिकी विभाग जबाबदार असतो. या अभियांत्रिकी विभागाचा प्रमुख हा इंजिनीअरिग इन चीफ असतो. यांच्यावर अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल दिलेला असतो. या दोघांच्या मदतीला असिस्टंट जे तांत्रिक विभाग सांभाळतात ते नेमलेले असतात. या विभागामाध्येच डेव्हल्पमेंट सेल म्हणजे विकासात्मक विभाग आणि बांधकाम विभाग यांचीसुद्धा विभागणी केलेली असते. ज्या काही वेगवेगळ्या केंद्रांच्या विभागणी करता जी काही तांत्रिक मदत लागते ती तांत्रिक मदत या विभागाकडून पुरवली जाते. नवीन केंद्र उभारणे, केंद्रामध्ये असलेले अडथळे दूर करणे, नवीन यंत्रसामग्री आणणे, जुन्या यंत्र सामग्रीची निगा राखणे या सगळ्या गोष्टींची जबाबदारी या अभियांत्रिकी विभागाला दिलेली असते.
तिसरा विभाग प्रशासनिक विभाग
या विभागला सगळ्या प्रकारच्या प्रशासनिक कार्य आथक कार्य आणि कार्यक्रमाशी निगडीत अशी कामे करावी लागतात. यासाठी त्यांचा पुन्हा एकदा वेगळा असा असिस्टंट डायरेक्टर जनरल नेमलेला असतो. यांचे इतर विभागांचे जे डायरेक्टर जनरल असतात त्यांच्यासोबतदेखील त्यांना काम करताना समन्वय ठेवावा लागतो. कर्मचा-यांचे वेतन, रजा, भत्ते, इतर सोयी-सुविधा यासंबंधीचे कार्य तसेच जाहिरातींच्या माध्यामंतून येणारा पैसा शासनाकडून येणारा पैसा त्याचे नियोजन तसेच कार्यक्रमांसाठी लागणारी सामग्रीचा पुरवठा या विभागाला कराव्या लागतात. हा विभागाच आकाशवाणीच्या ज्या काही वेगवेगळ्या तांत्रिक सोयीसुविधा असतात त्यांच्यासाठी आथक पुरवठा करण्याचे कार्य तसेच त्यासाठीचे आर्थिक नियोजन करण्याचे कार्य करत असतो म्हणून त्यांना अभियांत्रिकी विभागासोबत जुळवून घ्यावे लागते.
यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि जास्त ओळखला जाणारा विभाग म्हणजेच बातमी विभाग (न्यूज डिपार्टमेंट) या बातम्यांमधून वेगवेगळ्या भागांमध्ये २४ तास बातम्यांचे प्रसारण केले जाते हे प्रसारण वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि वेगवेगळ्या केंद्रांवरूनदेखील केले जाते. या विभागामध्ये सर्वात जास्त महत्त्वाची अशी जबाबदारी असते ती म्हणजे धोरणात्मक जबाबदारी. एकूणच देशाची व्यवस्था, सरकारचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणे या सगळ्या बाबी योग्य नियंत्रणाद्वारे प्रसारित केल्या जातात आणि त्याप्रकारे बातम्या तयार केल्या जातात. या डिपार्टमेंटच्या प्रमुख पदी वेगळा डायरेक्टर जनरल नेमलेला असतो. याखेरीज त्याच्या मदतीसाठी असिस्टंट किंवा डेप्युटी डायरेक्टर जनरल हेसुद्धा नेमलेले असतात. या विभागातर्फे ज्या बातम्या असतात त्यावेळी आकाशवाणीवरील बातम्यांचा विचार करतो तेव्हा २७ वेगवेगळ्या भाषांमध्ये बातम्या दिल्या जातात. या बातम्यांच्या व्यतिरिक्त बातम्यांवर आधारीत कार्यक्रम यांचीसुद्धा निर्मिती या विभागातर्फे केली जाते. याखेरीज परदेशी सेवा हा सुद्धा यांच्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. या सगळ्या बातम्या तयार करण्यासाठी वेगवेगळ्या केंद्रांवरती संपादक नेमेलेले असतात. यांना वृत्त संपादक अशी पदवी दिलेली असते. या वृत्त संपादकाच्या मदतीला सहसंपादक किंवा उपसंपादकसुद्धा नेमलेले असतात. हे उपसंपादक वेगवेगळ्या स्त्रोतांकडून येणा-या बातम्यांचे एकत्रीकरण करून आणि न्यूज बुलेटीनला अंतिम स्वरूप प्रदान करतात. यासाठी आकाशवाणीने वेगवेगळ्या ठिकाणी नेमलेले वार्ताहर कार्य करतातच पण त्याखेरीज पीटीसी पार्ट टाइम करस्पॉनडेंट म्हणजेच अर्धवेळ वार्ताहरांचीसुद्धा नेमणूक केलेली असते. या सगळ्यांकडून बातमी घेऊन बातमी विभाग आपलं कार्य करत असतो. आकाशवाणीच्या बातम्या या विश्वासार्ह आणि सौम्य पद्धतीच्या असतात. म्हणून त्यांचे वेगळेपण दिसून येते.

१२ वी पास विद्याथ्र्यांसाठी बी.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता तर पदवी उत्तीर्ण विद्याथ्र्यांसाठी एम.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु आहेत. संपर्क - वसंतराव काळे पत्रकारिता आणि जनसंवाद महाविद्यालय, बीड, ९५५२५५६३९७ ९५२७८१५१५१ ७४२०९०४०५५
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)