कौशल्य विकास : शोध रोजगाराचा !

25-05-2016 : 11:44:32
     341 Views

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांशी कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत सन २०२२ पर्यंत देशात ५० कोटी कुशल व्यक्ती निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या या धोरणानुसार महाराष्ट्र शासनाने देखील कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत सन २०२२ पर्यंत ४.५० कोटी लोकांना रोजगाराभिमुख कौशल्य विकास उपलब्ध करुन देण्याचे ठरविले आहे. हे कौशल्य विकास अभियान यशस्वी करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था स्थापन केलेली आहे.

राज्याचे मुख्य सचिव या संस्थेचे अध्यक्ष असून कौशल्य विकासाचे नियोजन करणे, समन्वय करणे, अंमलबजावणी आणि देखरेख आदी या संस्थेची उद्दिष्ट्ये आहेत. ही संस्था शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संचालनालयाच्या अखत्यारित आहे.

संस्थेतर्फे रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी वेबपोर्टल आणि उपलब्ध ऑनलाईन सेवासुविधा आहेत. उपलब्ध सेवासुविधांमध्ये (१) नोंदणी, प्रोफाईल व्यवस्थापन व रिझ्युमे अपलोड (२) शासकीय व खाजगी क्षेत्रातील रोजगार संधीचा शोध (३) रोजगार मेळावे तपशील व सहभाग नोंदणी (४) रोजगार प्रोत्साहन योजनेअंतर्गत (ईपीपी) ऑन जॉब प्रशिक्षण संधी (५) ॲप्रेंटीसशिपसाठी संधी (६) मॅचिंग पदांसाठी ॲप्लाय करणे (७) आदिवासी उमेदवारांना मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाबाबतची माहिती व नोंदणी (८) स्वयंरोजगाराच्या १५० पेक्षा अधिक शासकीय कर्ज योजनांची माहिती (९) २५० पेक्षा अधिक व्यवसाय व नमुना प्रकल्प अहवाल माहिती (१०) विविध अभ्यासक्रम व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था व बॅचेसची माहिती समाविष्ट आहे.

तसेच उमेदवारांनी आपली नोंदणी महारोजगार वेब पोर्टलवर ॲक्टीव्ह राहण्यासाठी प्रत्येक लॉगइन नंतर १ वर्षाच्या आत पुन्हा लॉगइन होणे आवश्यक आहे. रोजगार संधीचे ॲलर्ट नियमितपणे मिळण्यासाठी उमेदवारांनी स्वत:चे भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी सतत अद्ययावत ठेवा. नोकरीच्या संधी प्राप्त करण्यासाठी रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन इच्छुकता नोंदवून उपस्थित रहा.




comments