शिका व्हिडीओ एडिटिंग

25-05-2016 : 11:43:49
     394 Views

सध्या मनोरंजनाचे क्षेत्र झपाट्याने वाढताना दिसते आहे. त्यामुळे ज्या लोकांमध्ये रचनात्मक कौशल्य आहे, त्यांच्यासाठी व्हिडिओे एडिटिंंग हा चांगला पर्याय आहे. मनोरंजन किंवा मीडिया क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्यास व्हिडिओे एडिटिंगमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पोस्ट प्रॉडक्शनमध्ये व्हिडिओे एडिटिंगची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अलीकडच्या काळात आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे नॉन लिनियर एडिटिंगची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कारण कोणत्याही चित्रपट किंवा टिव्ही प्रोेग्रॅममधील वेगवेगळ्या कल्पना व्हिडिओे एडिटरशिवाय पूर्ण होत नाहीत.

*सृजनात्मकता महत्त्वाची : वेबसाइटवरील व्हिडिओे स्ट्रीमिंग आणि मुव्ही क्लीपींगमुळे व्हिडिओे एडिटिंगमधील करिअर अधिक लाभदायक होत आहे. व्हिडिओे एडिटिंंगमध्ये कोर्स केल्यास मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रात एक चांगली नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. या क्षेत्रात व्यक्तीगत कौशल्यांबरोबरच सृजनात्मकता अत्यंत महत्त्वाची आहे. त्याबरोबरच कॉम्प्युटरचे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे.

*मल्टीमीडिया कंपनीतही काम : नवनवीन डिजीटल तंत्रज्ञानाची आवश्यक माहीती, व्हिडिओे एडिटिंंग सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटरचे चांगल्याप्रकारे ज्ञान असेल, तरच व्हिडिओे एडीटर म्हणून काम करता येऊ शकते. आजकाल अनेक व्हिडिओे एडीटर वेबसाइटवर दाखवल्या जाणा-या व्हिडिओे क्लिप तयार करण्यासाठी नेमले जातात. त्याशिवाय वेगवेगळे न्यूज चॅनेल्स, टीव्हीवरील सिरीयल्स, फिल्म व्हिडिओे एडिटिंंग स्टूडीओे वेब डिझाइन कंपनी, अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी, मल्टीमीडिया कंपनी यातही नोकरी करता येते.

* कसे होते काम? : पीएचडीनंतर मीडिया इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर म्हणूनही काम करता येते. मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रात क्रिएटिव्ह काम करणा-यांसाठी अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. रेकॉर्डींगदरम्यान केलेल्या व्हिडिओेला एडिटिंग करून त्या माध्यमातून चांगली फिल्म तयार केली जाते. त्यामध्ये जे एडिटिंगचे काम करत असतात, त्यांना व्हिडिओे एडिटर असे म्हटले जाते. व्हिडिओे एडिटिंंग दोन प्रकारे केले जाते. लिनीयर आणि नॉन लिनियर एडिटिंग, लिनियर एडिटिंंगला टेप टू टेप एडिटिंंग असेही म्हटले जाते. यामध्ये फिल्म टेपला एक एक करून कॉपी केले जाते. त्यानंतर ते एडीट केले जाते. हे तांत्रिक पद्धतीच्या फिल्ममध्ये म्हणजेच रील व्हिडिओेमध्ये केले जाते. नॉन लिनियर एडिटिंगला डीजीटल व्हिडिओ असेही म्हणतात. यामध्ये एडिटिंग हे ऑनस्क्रीन कॉम्प्युटरवर केले जाते.

*प्रशिक्षण कुठे घ्याल? : सध्या अनेक संस्थांमध्ये व्हिडिओे एडिटिंंगचे कोर्सही घेतले जातात. त्यामध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स चालवले जातात. हे कोर्स सहा महीने किंवा दोन वर्षाचे असतात. त्याशिवाय जनसंज्ञापन आणि पत्रकारिता या कोर्सच्या माध्यमातूनही व्हिडिओे एडिटिंंगचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये वेगवेगळ्या एडिटिंग सॉफ्टवेअरविषयी माहिती दिली जाते.

वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड
comments