बीड जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी लातूर येथे सैन्य भरती मेळावा

2016-02-05 11:33:01
     172 Views

बीड
पुणे येथील क्षेत्रीय सैन्य भरती कार्यालयातर्फे लातूर येथील पोलीस परेड मैदान बाभळगाव येथे दिनांक ७ ते २२ एप्रिल २०१६ या कालावधीत पुणे, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सैन्य भरतीसाठी संपुर्ण नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करावयाची आहे. उमेदवारांना ही ऑनलाईन नोंदणी दिनांक २ फेब्रुवारी २०१६ पासून भारतीय सेनेच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी दिनांक २२ मार्च २०१६ हा अंतिम दिवस आहे असे पुणे येथील क्षेत्रीय सैन्य भरती कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.
comments