अडचणी ? नव्हे संधी !


व्यवसायात आणि नोकरीत वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आणि प्रश्न येऊ शकतात. या अडचणी कधी आर्थिक स्वरूपाच्या असतात तर काही वेळा तांत्रिक स्वरूपाच्या असतात. तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरी करत असता कंपनीच्या नव्या प्रकल्पाची जबाबदारी दिली जाते. या प्रकल्पाच्या उभारणीचे काम तुमच्याकडे सोपवले जाते. हे काम पूर्ण करण्यासाठी विशिष्ट मुदत दिली जाते. ही मुदत एक वर्ष, दोन वर्ष अशा पद्धतीची असते.
मात्र, हे काम मुदतीत पूर्ण करण्यात अनेक अडचणी येत असतात. या अडचणी सोडवतांना आपण त्या कशा सोडवतो याकडे कंपनीच्या वरिष्ठांचे लक्ष असते. अशा प्रकारच्या अडचणी सोडविताना आपण हातपाय गाळून बसलो तर त्याची योग्य ती नोंद कंपनीचे व्यवस्थापन घेते. हा प्रकल्प मुदतीत पूर्ण करणे जमत नाही, ही जबाबदारी दुस-या व्यक्तीकडे द्या असे अपण व्यवस्थापनाला कळवले तर व्यवस्थापनाकडून आपल्याला त्या नंतर कंपनीतील कोणतीच आव्हानात्मक जबाबदारी सोपवली जात नाही. त्यामुळे ज्या काही अडचणी येतील त्या आपल्या कंपनीतील वरिष्ठ अधिका-यांच्या मदतीने सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू करा. तुम्ही करत असलेले सकारात्मक प्रयत्न कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांच्या साक्षीनेच होतात. त्यामुळे या प्रयत्नांची नोंद घेतली जाते. तसेच हे प्रयत्न करताना तुम्ही कोणकोणते मार्ग अवलंबता हेही व्यवस्थापन पाहात असते. अशा एखाद्या प्रकल्पादरम्यान विविध अडचणीतून मार्ग काढत दिलेली जबाबदारी विशिष्ट मुदतीत किंवा मुदतीपूर्वी पूर्ण केल्यास कंपनीच्या वरीष्ठ अधिका-यांपर्यंत तुमची छाप पडते.
आपल्या मनात हे प्रश्न सोडविण्यासाठी एखादी कल्पना आली तर त्या कल्पनेची स्वतः टिंगल उडवू नका. मनात आलेली ही कल्पना तुमच्या प्रश्नावरचे उत्तर असू शकते. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरून आपल्या अडचणींवर उत्तर शोधण्याचे प्रयत्न करायला हवेत. असे करत असताना हा प्रश्न कोणामुळे निर्माण झाला याचाही तटस्थपणे विचार करा. तुमच्या वर्तनामुळे, तुमच्या निर्णयामुळे हा प्रश्न निर्माण झाला असेल तर त्याची कबुली कंपनीतील संबंधित वरिष्ठ अधिका-यांपुढे द्या. मनमोकळेपणाने तुम्ही अशी कबुली दिली तर व्यवस्थापन सकारात्मक दृष्ट्या विचार करते. कळत-नकळत घडलेल्या एखाद्या चुकीमुळे काही प्रश्न निर्माण झाला असेल तर त्या दृष्टीने त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. एखाद्या छोट्या प्रोजेक्टमध्ये तुमच्यातील समस्यांवर मात करण्याबाबतदची हातोटी दिसून आली तर व्यवस्थापनाकडून थेट तुम्हाला उच्च पदावर नियुक्ती करण्यापर्यंत प्रमोशन मिळू शकते.
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)