महिकावती नगरीचा राजा : मक्रध्वज

19-02-2015 : 08:29:11
     475 Views

चचवण = दत्ता वाकसे
मगरी गर्भ संभूतम | निशाचर सच्चीतौम ||
|| हनुमान पुत्र मक्रध्वज नमस्तुभ्यंम रझै म.म.सवैदो ||
हनुमंत पूत्र मक्रध्वज भारतात केवळ दोनच मंदिरे आहेत. एक काशित तर दुसरे चिंचवण महिकावतीनगरी येथील असून दि. २७ रोजी सकाळी सुर्योदयाबरोबर मक्रध्वज जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात संपन्न होत आहे. यानिमित्त मक्रध्वज जन्माची ही कहाणी..........
मक्रध्वज हा अंजनीपुत्र हनुमानाचा पुत्र आहे रामायनातील महर्षी वाल्मीक ऋषी यांनी लिहिलेल्या कृतयुगातील सत्य कथा आहे.
मक्रध्वज महाराज यांचा जन्म मगरी पासुन झालेला आहे. सितेचा शोध घेण्यासाठी रामचंद्र प्रभुंनी हनुमंतांना अज्ञा केली. त्यावेळस हनुमंतराय हे सितेचा शोध घेत-घेत लंका नगरीकडे गेले. तेंव्हा हनुमंतांनी रावनाच्या लंका नगरीस आपल्या शेपटीने आग लावली. तेंव्हा सर्वत्र लंका लहन होत असतांना अंजनी पुत्र हनुमंत परत निघाले असताना त्यांच्या संपूर्ण शरीरास घाम आला त्यांचे उडान चालु असताना ते समुद्र मार्गी जात होते. तेंव्हा त्यांना आलेला घाम हनुमंतांनी आपल्या हाताने पुसला. त्यावेळी त्या घामाचे दोन थेंब समुद्रामध्ये पडले असता ते दोन थेंब समुद्रात असलेलरूा मगरीने गिळंकृत केले. त्यामुळे त्या मगरीस गर्भ धारणा झाली. त्यातुन नऊ महिने नऊ दिवसांनी म्हणजे प्रौंष शुद्ध पौर्णिमेला मक्रध्वजांचा जन्म सकाळी सुर्यदयाबरोबर झाला. ब-याच कालावधीनंतर हनुमंत पुत्र मक्रध्वज हे पाताळामध्ये अहीरावन व महिरावन यांचे मक्र सरशेनापती म्हणून कार्य करू लागले. अशातच आहिरावन आणि महिरावन यांनी राम आणि लक्ष्मण यांना बळी देण्यासाठभ बंदी करून पातळामध्ये गुप्त ठिकाणी ठेवले. त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी हनुमंत पुत्र मक्रध्वज यांच्या कडे सोमविण्यात आली. राम आणि लक्ष्मण यांचा शोध घेत हनुमंत सर्वत्र फिरू लागले परंतु त्यांचा शोध काही केल्या संपत नव्होता.हनुमंत शोध घेत घेत पाताळामध्ये आले असता त्याठिकाणी मक्रध्वज महाराज आपल्या हातामध्ये गदा घेऊन राम आणि लक्षमण यांच्या रक्षणार्थ त्या गुहेच्या द्वारामध्ये बसले होते. हनुमंतांनी मक्रध्वजास विचारले की, आपण या ठिकाणी काय करता आहात. तेंव्हा मक्रध्वजांनी सांगितले की, या ठिकाणीराम आणि लक्ष्मण यांना अहिरावन आणि महिरावन यांनी महिकावती देवीला बळी देण्यासाठी गुहेमध्ये बंदीस्त करून ठेवले आहे. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. त्या करीता मी येथे बसलेलो आहे. तेंव्हा हनुमंताच्या लक्षात आले की, प्रभु रामचंद्र आणि लक्ष्मण हे या गुहेमध्ये बंदीस्त करून ठेवले आहे. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. त्या करीता मी येथे बसलेलो आहे. तेंव्हा हनुमंताच्या लक्षात आले की, प्रभु रामचंद्र आणि लक्ष्मण यांना घेऊन जायचे आहे. मला गुहेमध्ये प्रवेश करूदे अशी विनंती केली, परंतु मक्रध्वजांनी काहीकेल्या त्यांना त्या गुहेमध्ये प्रवेश करू दिली नाही. त्या दोघांमध्ये त्यावरून मुष्ठी युद्ध सुरू झाले. हनुमंतांनी मक्रध्वज खाली पाडले आणि त्यांच्या छातीवर पाय ठेवून मक्रध्वजास मारू लागले. तेंव्हा हनुमंतांनी मक्रध्वजास विचारले की, तुझे रक्षण करण्यास आता कोण कोण येईल ? तेंव्हा मक्रध्वजाने सांगितले अंजनीपुत्र हनुमंतराय असते तर तुला त्यांनीच सांगितले असते ! असे मक्रध्वजाने सांगताच अंजनीपुत्र हनुमंत आचर्य चकीत झाले आणि म्हणाले मीच तो रामभक्त हनुमान आहे ! तेंव्हा हनुमंतांनी मक्रध्वजास विचारले की, तुझे आणि हनुमंताचे काय संबंध आहेत? त्यावेळी मक्रध्वज हनुमंतास सांगु लागले की, प्रभु रामचंद्राचे भक्त हनुमंत हे माझे वडील आहेत. हे सर्व ऐकुन हनुमंतास धक्का बसला आणि विचार करू लागले की, आपण तर ब्रम्हचारी आहोत मग हा सर्व प्रकार काय आहे. हे पाथक माझ्या मागे कशासाठी असे म्हणून विचारात हनुमंत मग्न झाले त्यावेळी हनुमंतानी मक्रध्वजास विचारण्यास सुरूवात केली. मी तर ब्रम्हचारी आहे. मग तु माझा मुलगा कसा ? त्यावेळी मक्रध्वज हनुमंतास सांगतात की, माझी आई मगरीन ती सध्या समुद्रामध्ये वास्तव्य करीत आहे. आपण जेंव्हा रावनाच्या लंकेचे दहन करून आकाश पंती समुद्र मार्गी जात असताना आपण आपल्या शरिरास आलेला घाम पुसला आणि त्या घामाचे दोन थेंब समुद्रात पडले आणि ते दोन घामाचे थेंब माझ्या आईने म्हणजे मगरीने गिळले. त्यापासून माझा जन्म झाला. हे ऐकुन हनुमंतराय विचार मग्न झाले. ही सर्व हकीकत ऐल्यास हनुमंत आणि मक्रध्वज हे समुद्राकडे गेले. तेथे मक्रध्वजानी आपल्या आईस हाक मारली तेंव्हा मगरीन समुद्रातून बाहेर आली आणि हनुमंतरायाचे दर्शन घेऊन मक्रध्वज जन्माचा पुर्व वृत्तांत हनुमंतास सांगितला. तेंव्हा हनुमंतास सत्य तेथुन परत हनुमंत आणि मक्रध्वज त्या पाताळामधील गुहेजवळ आल तेंव्हा मक्रध्वजांनी आपल्या वडीलास म्हणजे अंजनी पुत्र हनुमंतास साष्टांग दंडवत घातला. हनुमंतानी गुहेमध्ये प्रेवश पुढे हनुमंतांनी त्या गुहेमध्ये जाऊन ज्या ठिकाणी राम आणि लक्ष्मण यांना बंदी करून ठेवले होते. तेथे महिकावती देवी होती. तया देवीस राम आणि लक्ष्मण यांचा बळी देण्यात येणार होता. हनुमंतांनी महिकावती देवीस आपल्या शक्तीने एका मोठ्या मोरीच्या तोंडात पालतो करून त्यामुळे राम आणि लक्ष्मण यांचा बळी देण्यात आला नाही आणि आहीरावन आणि महिरावन यांच्या बरोबर युद्धा करून त्यांचा वध करण्यात आला. राम आणि लक्ष्मण यांची सोडवणूक करून हनुमंत राम आणि लक्ष्मण यांना घेऊन त्या गुहेच्या बाहेर पडले. प्रभु रामचंद्र आणि लक्ष्मण यांनी हनुमंतास सांगितले या तुझ्या मुलाला या महिकावती नगरीचा राजा म्हणून याचया राज्य अभिषक करू या असे म्हणतात मक्रध्वजास महिकावती नगरीचा राजा म्हणून राज्य अभिषेक करून त्यांची स्थापना करण्यात आली. नंतर तेथुन हनुमंतांनी आणि राम लक्ष्मण यांना आपल्या खांद्यावर घेऊन लंकेकउे उडान करून प्रस्थान केले. नंतर रावनाचा वध केला. असा हा अंजनी पुत्र मक्रध्वज महिकावती नगरीचा राजा झाला.
म्हणूनच की काय या चिंचवण गावचे पहिले नाव महिकावती नगर असे होते. हे यावरून दिसून येते. येथे मंकावती देवीचे मंदिर शुद्धा येथे पहावयास मिळते. या मक्रध्वजा बद्दल सर्व ग्रंथामध्ये ओवी बद्ध ओव्या उपलब्ध आहेत. विशेष करून राम विजय ग्रंथामध्ये अध्याय २१ वा व अध्याय ३१,३२,३३ या अध्यायामध्ये विशेष मक्रध्वजा बद्दल उल्लेख आहे. त्यांचे वर्णन महर्षी वाल्मीकऋषींनी कृतयुगात रामयनात केलेला आहे. म्हणुनच वै. गुरूवर्य भगवानबाबा यांनी मक्रध्वज जन्म सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह ई.स.१९५२ पासुन सध्या हा सप्ताह चालु असून चिंचवण आणि परिसरातील भावीक भक्त या जन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने भक्तीमय वातावरणाध्ये तलीन झालेले आहेत. या गावामध्ये सर्वजाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात. गावामध्ये आठरापगड जातीचे लोक आहेत. गावाची लोकसंख्या ५००० ते ५५०० हजार आहे. तसेच मक्रध्वजाचे मंदिर हे केवळ एकमेव मंदिर महाराष्ट्रामध्ये चिंचवण येथे आहे. परंतु विकासामध्ये हे मंदिर खुप मागे राहिलेले आहे. त्यामुळे शासनाने या मंदिरास व गावा पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन मंदिराचा व गावाचा विकास करून दिल्यास या देवाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात होईल.
ज्या जन्म सोहळा निमित्ताने अनेक भावीक भक्त आपल्या मनोकामना पुर्ण व्हाव्यात म्हणुन या मक्रध्वजास नवस करत व त्या पुर्णही होतात अशी श्रद्धा येथील भावीक भक्तांची आहे. येथे भजन,पुजन, कार्यक्रम सतत चालतात. या सर्व निमित्तानेच येथे शेवटी पौष शुद्धा पोर्णीमेला सकाळी सुर्यउदया बरोबर हा सोहळा साजरा करून शेवटी महाप्रसादाचा लाभ सर्व भावीक भक्तांना दिला जातो. सतत सात दिवस गावातल लोक या निमित्ताने अन्नदान करतात. या निमित्ताने सर्व भावीक भक्तांना विनंती की, आपण सुद्धा ऐकवेळ येऊन मक्रध्वज जन्म सोहळा पहावा व देवाचे दर्शन घ्यावे म्हणजे आपले मन प्रसन्न होऊन उच्छा पुर्ण होतील.
comments