पर्यटन विकासाच्या प्रतीक्षेत मराठवाडा

13/09/2012 18 : 34
     342 Views

मराठवाड्यातील औरंगाबाद शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून २०१० मध्ये तत्कालीन पर्यटन मंत्री विजयकुमार गावीत यांनी दर्जा दिल्याचे जाहिर केले होते.त्याच बारोबर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यामध्येही पर्यटनाच्या विकासावर भर दिला जाईल असे आश्वासन दिले होते.मात्र औरंगाबाद
शहर आणि माराठवाड्यातील तीन-चार प्रसिद्ध ठिकाणे सोडली तर आज ही पर्यटन विकासाच्या प्रतिक्षेत मराठवाडा आसल्याचे दिसते आहे.
चालु महिन्यात औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.आंतरराष्ट्रीय परिषदही केवळ उद्घाटनातील मानसन्मान,खाणे-पीणे,आणि अजिंठावेरूळ येथे भेट देण्यापुरतीच मर्यादीत राहिली होती.या परिषदेच्या माध्यमातुन केवळ औरंगाबाद येथेच पर्यटनासाठी वाव आहे असा संदेश गेला.मात्र मराठवाड्यातील बीड,उस्मानाबाद,नांदेड,लातुर या जिल्ह्यामध्येही विविध ठिकाणांचा थोड्या-फार प्रमाणात विकास केल्यास पर्यटन वाढीला निश्चितच दिशा मिळू शकते.मात्र महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे दुर्लक्ष आणि आपले विकासाप्रती उदासीन असलेले लोकप्रतिनिधी यामुळे पर्यटन विकासाच्या बाबतीत ही मराठवाड्याची उपेक्षाच झाल्याचे आपणाला दिसते आहे.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यावस्थापकीय संचालक यांनी,मेगा-सर्किट योजनेच्या माध्यमातून औरंगाबाद परिसर,माहूर,नांदेडचे विष्णुपुरी बॅकवॉटर,कंधारचा किल्ला आदीच्या विकासासाठी ७० कोटी रूपये उपलब्ध होणार असल्याचे सांगीतले.मात्र यामध्ये बीड जिल्ह्यातील कंकालेश्वर मंदीर,बींदुसरा बॅकवॉटर,सौताडा येथील रामेश्वर मंदिर,उस्मानाबाद जिल्ह्यातील लेण्या,नळदुर्गचा किल्ला,तुळजापुर तिर्थक्षेत्र यांच्या पर्यटनविकासाच्या दृष्टीने पर्यटन महामंडळाने महाने गरजेचे आहे. इथल्या पर्यटन विकासाला चालना मिळाल्यास रोजगार,उद्योग निर्माण होऊन विकासाला दिशा मिळू शकते.
पर्यटन विकास म्हणजे केवळ प्राचीन मंदिरे,तिर्थक्षेत्र,गार्डन यापुरती मर्यादित संकल्पना विचारात न घेता महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने कृषी पर्यटनाच्या माध्यमातुन व शेतीला जोडधंदा निर्माण घेऊन पर्यटन उद्योगांच्या माध्यमातून प्रत्याक्ष शेतक-याला कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.कृषी पर्यटनाच्या माध्यमातुन ग्रामीण कृषी संस्कृती,शिवार फेरी,हूर्डा पाट्र्या,बैलगाडी सफर,वनभोजन असे उपक्रम राबवता येतील.त्याच्या माध्यमातुन ख-या अर्थाने पर्यटन विकासाबरोबर शेती व शेतकरी विकासाला निश्चित प्राधान्य मिळू शकते.
मराठवाड्यात देशांतर्गत राज्यातील पर्यटक आणि परदेशातील पर्यटकांनी मोठ्याप्रमाणात भेटी द्याव्यात यासाठी पर्यटन ठिकाणाची जाहिरात सर्वच प्रकारच्या माध्यमातुन करावी लागणार आहे. त्याच बरोबर पर्यटकांना येण्या-जाण्यासाठी विमान,रेल्वे सेवा,रहाण्यासाठी दर्जेदार हॉटेल आणि त्यांच्या संरक्षणाची पुरेपुर काळजी घेणे अपेक्षीत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मराठवाड्याच्या पर्यटन विकासाचा बृहद आराखडा तयार करावा. त्यामध्ये मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील ऐतिहासिक,आधुनिक व कृषी स्थळांचा समावेश असावा. ज्यामुळे मराठवाड्यातील पर्यटन विकासाला निश्चित गतिमानता मिळेल. ज्यामुळे मराठवाड्यात नवनवीन रोजगार निर्मिती होईल.
प्रा.विठ्ठल एडके
vbedake@gmail.com
comments