लोकसहभाग, श्रमदानातून झालेल्या कामाची आ.ठोंबरे यांच्याकडून पाहणी

2016-02-04 19:31:13
     434 Views

अंबाजोगाई( प्रतिनिधी)
तालुक्यातील कुंबेफळ येथील चालू असलेल्या लोकसहभागातून,श्रमदानातुन करण्यात आलेल्या कामाची आ.प्रा.संगीताताई ठोंबरे यांच्याकडून अचानक पाहणी करण्यात आली. यावेळी २००च्या जवळ गावातील ग्रामस्थ श्रमदान करताना दिसून आले.यावेळी येथील काम बघून आ.प्रा.संगीताताई ठोंबरे अचम्बीत झाल्या.जे होऊ शकत नाही ते येथील युवकानी एकत्र येऊन करून दाखवले असल्याचे त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि कुंबेफळ गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील तसेच झालेल्या कामावर ना.पंकजाताई(पालवे)मुंडे यांच्या मार्गदर्शनाखली येणार्‍या काळात सिमेंट बंधारे देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.या गावच्या विकास कामासाठी कधीच मागे पडणार नाही असेही त्या म्हणाल्या.यावेळी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन जे शक्य नाही ते करून दाखवले असून ते बघण्यासाठी आतापर्यंत नेते,सामाजीक कार्यकर्ते,आजी माजी आमदार तसेच जागतिक जलतज्ञ राजेंद्रसिंहजी राणा (पाणी वाले बाबा)यांनी देखील भेट देऊन गावकरी यांचे अभिनंदन केले आहे.

यावेळी आ.प्रा.संगीताताई ठोंबरे यांनी गावातील गोविंद जाधव ज्यांनी गावाला प्रेरणा दिली त्यांचा सत्कार केला.यावेळी शिवाजी डोईफोडे,वसंत शिंपले यांनी कामाची माहीती सांगितली.तसेच आ.संगीताताई यांना गावातील ग्रामस्थ आणि युवकानी झालेली कामे दाखवली.
comments