चिंचोलीमाळीत संत जनाबाईंंचे मंदिर

2015-10-15 14:04:44
     386 Views

बीड (प्रतिनिधी) : केज तालुक्यातील चिंचोली ( माळी ) येथे श्रीसंत जनाबाईंचे गंगाखेड नंतर महाराष्ट्रातील ५७ फुट उंचीचे दुसरे मंदिर उभारण्यात आले आहे . मंदिरात शुक्रवारी ( दि.१६) विविध महंत व महाराज मंडळींच्या उपस्थितीत मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून या निमित्ताने बुधवार पासून तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .
केज तालुक्यातील चिंचोली ( माळी ) येथील ग्रामदैवत श्रीसंत नामदेव महाराज यांच्या प्रेरणेतून मातंग समाजाचे लोक गेल्या १२५ वर्षापासून अखंडपणे हरिनाम सप्ताहाची धार्मिक परंपरा जोपासत होते . त्याठिकाणी मंदिर नसल्याने समाज मंदिरात दरवर्षी हा धार्मिक कार्यक्रम होत असे मागील काही वर्षापासून या कार्यक्रमासाठी येणा-या महाराज मंडळींनी याठिकाणी मंदिर उभारण्याचे सूचित करीत असत . त्यामुळे यावर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळा मंदिराची उभारणी करून साजरा करण्याचा निश्चय गतवर्षीच्या कार्यक्रमात केला होता.त्यानंतर ग्रामस्थ व विविध श्रेत्रातील मान्यवरांनी देणगी रुपी केलेल्या सहकार्यातून मंदिर उभारणीस सुरुवात झाली . यासाठी राजकीय क्षेत्रातील नामवंतांनी ही भरभरून सहकार्य केल्याने आवघ्या सहा महिन्याच्या काळात ५७ फुट उंचीच्या संत जनाबाईंच्या मंदिराची उभारणी पूर्ण झाली . मंदिर उभारणीसाठी हभप सुनिल महाराज गालफाडे यांच्यासह समाजातील तरुणांनी पुढाकार घेतला .
मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने बुधवारी गावातून मूर्तीची मिरवणूक काढून महायज्ञाला सुरुवात होणार आहे . मंदिरात शुक्रवारी ( दि.१६) संत जनाबाईंच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठा लाडेवडगावच्या वेदांत साधना स्थली गुरुकुलचे परमपुज्य स्वामी भारतानंदजी स्वामी यांच्या हस्ते व महाराष्ट्रातील नामवंत महंत व महाराज मंडळींच्या उपस्थितीत संत जनाबाईंच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे . त्यानंतर आचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद वाटपाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. बुधवारी रात्री हभप शारदाताई महाराज आळंदीकर यांचे व गुरुवारी रात्री संदीपान महाराज हासेगावकर यांचे किर्तन होणार आहे. तरी या कार्यक्रमास भावीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हभप सुनिल महाराज गालफाडे व ग्रामस्थांनी केले आहे .
जात्यावर दळतानाची
विठ्ठल-जनाबाईची मूर्ती
या मंदिरात विठ्ठलासोबतची जनाबाईची मूर्ती बसविण्यात येणार आहे . कंबरेवर हात ठेऊन उभा असलेली विठ्ठलाची मुर्ती पाहण्यास मिळते . मात्र या मंदिरात बसविण्यात येत असलेली मुर्ती बसलेल्या अवस्थेत असुन विठ्ठल श्रीसंत जनाबाई सोबत जात्यावर दळण दळत आहे.
comments