ग्रामप्रिया अंडी उत्पादक कोंबडी


शेतक-यांचा जोडधंदा, उत्पादनाचे स्त्रोत म्हणून कुक्कुटपालन अत्यंत उपयोगी आहे. परसबागेतील कुक्कुटपालनासाठी गिरीराज, वनराज, सुवर्णधारा, कॅरी, निर्भिक या जातीबरोबरच ग्रामप्रिया नावाचे जात ग्रामीण व आदिवासी भागात अंडी उत्पादनासाठी उपयुक्त अशी आहे. ही जात जास्त अंडी देते व या जातीचे गुणधर्म गावरान देशी कोंबडी प्रमाणे आहेत.
वैशिष्टये : मध्यमवजन, लांब व मजबूत पाय, चांगले अंडी उत्पादन, गुलाबी व तपकिरी रंगाचे अंडी
व्यवस्थापन : सुरुवातीची सहा आठवडे ते दीड महिना काळजी घ्यावी लागते. पक्षी लहान असताना थंड वातावरण असेल तर पिल्लांना २ वॅट/ पिल्लूप्रमाणे उब द्यावी, यासाठी बल्बाचा वापर करावा.
खाद्य : सुरुवातीच्या दोन दिवस पक्ष्यांना मका बारीक भरडून द्यावी. बाजारातील ब्रायलर प्रिस्टार्टर दिले अधिक चांगले. ज्वारी, बाजरी, तांदुळाचा चुरा, सूर्यफूल व शेंगदाण्याची पेंड द्यावी क्षार, खनिज, कॅल्शियम, फॉस्फरस,लायसीन व जीवनसत्वे यांचे
मिश्रण मिसळून घरी तयार केलेले खाद्या किंवा गावरान स्टार्टर खाद्य दिले तरी चालते. शुध्दपाणी, काही औषधे व तणावमुक्त करणारी औषधी सुरुवातीचे पाच दिवस पाण्यातून पुरवठा करावे. या खाद्याव्यतिरिक्त एक महिन्यानंतर पक्ष्यांना लसूणघास, शेवग्याचा पत्ता, पालक थोड्या प्रमाणात दिली तर पंखांना चकाकी येते.
आरोग्य व्यवस्थापन :
ही जात तशी रोग प्रतिकार आहे तरीदेखील भविष्यात मर व रोगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लसीकरण हा सोपा मार्ग आहे.
एक दिवस वय असेल तर मरेक्स, एचव्हीटी ०.२० एमएल कातडी खाली द्यावा. पाच दिवसानंतर राणीखेत नावाची लस लासोटा प्रकार १ थेंब डोळ्यात द्यावी. १४ दिवसानंतर गंबरी / आयबीडी, जॉर्जिया प्रकारची लस १ थेंब डोळ्यांत किंवा तोंडात द्यावी.२१ दिवसानंतर देवी नावाची फॉऊल पॉक्स ०.२०एमएल मासांत किंवा कातडीत द्यावी.
लसीकरण करण्याच्या दिवशी तणावमुक्त करणारी औषधी पाण्यातून प्यायला द्यावी. लसीकरण सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी सहा नंतरच करावे. पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार लसही बर्फाच ठेवावी.
परसातील व्यवस्थापन-
सहा सात आठवडे वयाचे पक्षी साधारणत: ४०० - ५०० ग्राम वजनाचे होतता या वेळी त्यांना तणावमुक्त वातावरणात सोडतात. रात्री त्यांना खुराड्यात ठेवावे. शुध्द व ताजे पाणी द्यावे. ज्वारी, बाजरी व तांदुळाचा चूरा खाण्यास द्यावा. या व्यतिरिक्त माद्यांचे वजन सहा महिन्यात १.६ ते १.८ किग्रॅ. पर्यंतच मर्यादित ठेवावे.अंडी उत्पादन सुरू झाल्यावर टरफल नसलेली अंडी उत्पादन टाळण्यासाठी लाईम पावडर किंवा शिंपल्याचा भुगा किंवा कॅलशिअम फॉस्फरसची पावडर खाद्यात मिसळून द्यावी. नर पक्षी त्यांचे सरासरी विक्री योग्य वजन झाल्यावर कधीपण विकले तरी चालतात. राणीखेत व देवी रोगाची लसीकरण दर सहा महिन्याच्या अंतराने करावे.
ग्रामप्रिया : सहा आठवडे, ४०० ते ५०० ग्रॅम वजन,
सहा सात महिने- १६०० ते १८०० ग्रॅम,
पहिले अंडी देण्याचे वय- १६० - १६५ दिवस
१.५ वर्षाला अंडी उत्पादन- २००-२३०
अंड्याचे वजन- ५२ - ५८ ग्रॅम,
अंड्याचा रंग- तपकिरी, गुलाबी
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)