सेंद्रिय शेती प्रक्रियेतील आवश्यक गोष्टी

19-02-2015 : 08:35:50
     721 Views

सेंद्रिय शेती चळवळीचे मुख्य ध्येय साध्य होण्यासाठी काही तंत्र वापरले आहेत ज्यात मुख्यत्वेकरून नैसर्गिक परिस्थितीत संतुलनाला महत्त्व दिले आहे. मुख्य ध्येयाच्या विरोधात जातील अशा उत्पादन पध्दतीचा समावेश टाळला आहे.
मूलत: बागायत ,शेती व वनसंवर्धनाच्या शास्त्रात उत्पादन हे जमिनीचा कस (सुपीकता) ,मातीची संरचना वातावरण व प्रयुक्त वनस्पतीच्या जातीवर अवलबून आहे उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय शेती पध्दतीत खालील तंत्राचा वापर होतो.
-पिकांचे नियोजन
- सेंद्रिय पदार्थाचे नूतनीकरण आणि उपयोग
- कीटक,रोग व तूण नियंत्रणाकरीता कूत्रिम खत,कीटकनाशके व तूणनाशकांचा वापर टाळून इतर अन्य पध्दतीचा समावेश
- पशुसंवर्धनाच्या बाबतीत मूलत: पोषक व परिस्थितीत त्यांच्या गरजावर भर दिला आहे.
- चांगल्या दर्जाचे पुरेसे सेंद्रिय खाद्य उपलब्ध करणे.
- गुरांच्या नैसर्गिक व्यवहार व गरजाप्रमाणे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे.योग्य पशुचिकित्सा.
सेंद्रिय कूषि पध्दतीत पशुपक्षांचे महत्त्वाचे स्थान आहे.कारण पशुपक्षी
- पोषक द्रव्याचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवतात.
- सेंद्रिय पदार्थाचे रुपातर करुन जमिनीची सुपीकता वाढविण्यास प्रामुख्याने मदत करतात.
- काही जातीचे पशुपक्षी शेतीचा काही भाग वापरात आणतात जो अन्यथा वापरात आणल्या जात नाही.
comments