About Us
  • बीड लाईव्हची भूमिका

    आजचे युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. या आधुनिक युगात संगणक तंत्रज्ञानाच्या बळावर संवाद क्षेत्रात संवाद क्रांती घडून आली आहे.संपूर्ण जग हे माऊसच्या एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे.त्यामुळे मानवी जीवन गतीमान होण्यास मदत झाली आहे. आज प्रत्येक व्यक्तीने माहीती तंत्रज्ञानाची कास धरून डिजीटल संवाद क्रांतीत सहभागी झाले पाहीजे.त्या दृष्टीने बीड लाईव्हच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न...
    आजची प्रचार आणि प्रसार माध्यमे मानवी जिवनाशी एवढी एकरूप झाली आहेत की मानवाचे मन आणि मत परिवर्तन करणारी एक शक्ती ठरली आहेत.भारतीय लोकशाही शासन प्रणालीमध्ये तर प्रचार आणि प्रसार माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन स्थान देण्यात आले आहे.नव समाज रचनेत माध्यमाचे महत्व अनन्य साधारण आहे.मानवी मनाला प्रेरणा,प्रोत्साहन देणारी आणि सामाजिक विकासाला गतीमान करणारी शक्ती ठरलेल्या माध्यम शिक्षणाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे.बीड जिल्ह्यातील ग्रामिण भागातील विद्यार्थांना माध्यमाचे शिक्षण घेण्यासाठी औरंगाबाद,पुणे,मुंबई,कोल्हापुर अशा ठिकाणी जावे लागत होते.या ठिकाणी शिक्षणास जाणे आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हते.हेच लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील विद्यार्थांना माध्यमाचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणारे महाविद्यालय युवकांचे नेते रमेशराव पोकळे यांनी २००६ मध्ये बीड शहरात सूरू केले.माध्यमांचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणारे वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय हे महाराष्ट्रातील ग्रामिण भागातील एकमेव महाविद्यालय आहे.या महाविद्यालयामध्ये विद्यार्थांना मुद्रीत माध्यमे,दूरचित्रवाणी,आकाशवाणी,जाहीरात,माहीतीपट,कार्पाेरेट जनसंपर्क याचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते.आज महाविद्यालयातील विद्यार्थी बीड जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक वृतपत्रे,वृतवाहीन्या,आकाशवाणी,खाजगी एफ.एम. आणि शासकीय नौक-यामध्ये यशस्वीपणे काम करत आहेत.
    सध्या मुद्रीत माध्यमे,दूरचित्रवाणी,आकाशवाणी,जाहीरात,माहीतीपट,कार्पाेरेट जनसंपर्क या ठिकाणी नवमाध्यमाचा म्हणजेच इंटरनेटचा सर्वात जास्त वापर केला जात आहे.त्यामुळे मुद्रीत माध्यमे,दूरचित्रवाणी,आकाशवाणी,जाहीरात,माहीतीपट,कार्पाेरेट जनसंपर्क ग्रामिण भागातील विद्यार्थांना माहीतीतंत्रज्ञान क्षेत्राची माहीती व्हावी आणि प्रत्यक्ष त्यामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी त्यासाठीच महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रमेशराव पोकळे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नामदेव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली बीड लाईव्ह हे ऑनलाईन न्युजपेपर सुरू केले आहे. हा उपक्रम म्हणजेच विद्यार्थांचे लेखनकौशल्य विकसीत करणे आणि भारतीय लोकशाहीतील चौथा स्तंभ मजबूत करणे.तसेच निपक्षपाती भूमीका घेवून समाजात ताठमानेने विकासात्मक पत्रकारिता करावी.याच बारोबर माध्यमाच्या विद्याथ्र्यांनी उद्याच्या समाजाचे सक्षमनेतृत्व करावे,नवसमाजाची निर्मीती करून सक्षम राष्ट्र उभारणीस हातभार लागावा एवढीच अपेक्षा...!